Posts

Showing posts from 2022

पेगासस चा ही फुसका बार…

Image
 पेगाससचाही फुसका बार… साप साप म्हणायचे आणि भुई थोपटायची, अशी सवय काँग्रेस पक्षाला झाली आहे. राहुल गांधींपासून तालुका अध्यक्ष पर्यंत सगळे याच माळेचे मणी आहेत. यांच्या आरोपांत काही तथ्य नसते, तरीही ते ओरडत सुटतात. मोदींना शिव्या दिल्या की ल्युटिअन्स मीडिया उचलून धरतो. संसदेतले कामकाज रोखता येते. डावे पक्ष यांच्यासारखे बोलभांड सोबत घेतले की गलका करता येतो हा काँग्रेसचा गेल्या आठ वर्षातला नित्यक्रम झाला आहे. पण प्रत्येकवेळी आरोप फुसके निघतात आणि हे सगळे तोंडावर आपटतात. पेगासस प्रकरणात तसेच घडले आहे.  केंद्र सरकारने विदेशातून पेगासस नावाचे सॉफ्टवेअर खरेदी केले, त्याचा वापर करून विरोधकांच्या फोन संभाषणावर लक्ष ठेवले जात आहे, असा खोटा आरोप हंगामी राजकारणी राहुल गांधी आणि त्यांच्या चौकडीने केला. त्यांनी आरोप करायचीच खोटी, मोदी विरोधातील माध्यमे आणि राजकीय पक्ष झाडून कामाला लागले. शिमग्यालाही लाज वाटावी, अशी बोंबाबोंब करण्यात आली. संसद बंद पाडली गेली. पत्रकार परिषदांचा रतीब सुरु झाला. प्रकरण न्यायालयात गेले.  मुळात विरोधक नेमके काय बोलतात यावर लक्ष ठेवण्यासाठी कोणत्याही सॉफ्टवेअर...

अखेर ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटला*

Image
 *अखेर ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटला* यशाच्या श्रेयाचे धनी व्हायला सर्वंच तयार असतात; परंतु अपयशाचे वाटेकरी व्हायला कुणीच तयार नसतं. ओबीसी आरक्षणाच्या बाबतीतही तोच अनुभव येतो आहे. सर्वोच्च न्यायालयानं आता ओबीसी आरक्षणाला मान्यता दिली असली, तरी घटनेच्या मूळ तत्त्वाला कोणतीही बाधा पोहचणार नाही, याची दक्षता न्यायालयानं घेतली आहे. आरक्षणाच्या मर्यादेचा भंग झाल्यानं तर सर्वोच्च न्यायालयानं आरक्षण रद्द केलं होतं. आता आरक्षण आपल्यामुळं मिळालं असा दावा करणारे आणि ज्या बांठिया आयोगाच्या अहवालाचा आधार घेतला जात आहे, त्या बांठिया आयोगावर सर्वंच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी - खास करून काँग्रेस आणि भाजपा नी - टीका केली होती, हे लक्षात घेतलं, तर श्रेय आणि अपश्रेय कुणाचं हे लक्षात यायला हरकत नाही. आता बांठिया आयोगाच्या अहवालाच्या आधारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संघटनेच्या निवडणुका घ्याव्यात असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळं बांठिया आयोगाच्या कामकाज पद्धतीवर टीका करणाऱ्या राजकीय नेत्यांनाही परस्पर उत्तर मिळालं आहे. राज्यातील ओबीसी आरक्षणासह निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. छगन भुजब...

Sri Lanka's slide to disaster

Image
 *How Sri Lanka got ruined...* Voted for DYNASTY Lankans voted for Rajapakshas knowing very well what they did in the past including corruption, selling out national assets to China, dynastic politics and all. They still voted for them because Rajapakshas promised things they could not refuse. 1. Their GST, called VAT Tax, on all products was reduced to 8%, thus making everything cheaper in one stroke. (It  also killed the govt revenue). People loved things getting cheaper. 2. The minimum Income Tax threshold was changed from 5 Lakhs per annum to 30 Lakhs! Very few earned more than 30L! A very large part of the population became tax exempt. This was very popular among the salaried class. 3. For those with income over 30 Lakhs,  the upper ceiling of maximum personal tax of 15% was created, so no one paid over 15% tax. For comparison, it is around 42% in India and between 40 to 60% in many developed countries. 4. Corporate tax was promised to be reduced to 14%! Every corpor...

आषाढी एकादशीची श्री विठ्ठल रखुमाई ची शासकीय महापूजा ..!

Image
 *आषाढी एकादशीची श्री विठ्ठल रखुमाई ची शासकीय महापूजा ..!* #आषाढीएकादशी निमित्त श्री क्षेत्र #पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली. #आषाढीएकादशी च्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. वारकऱ्यांना सोयी-सुविधा देण्यात शासन कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख, समृद्धी येण्यासाठी कोरोनासह सर्व अडचणी दूर कर,असे साकडे त्यांनी विठ्ठला चरणी घातले. महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री असतात त्यांना दरवर्षी आषाढी एकादशी च्या दिवशी विठ्ठल -रखुमाई च्या पूजेचा मान मिळत असतो. अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आहे. इंग्रजांच्या काळात, हिंदू कलेक्टर, प्रांत, मामलेदार, सेवाज्येष्ठतेनुसार शासकीय पूजा करीत होते.१९७० मध्ये, समाजवादी लोकांनी ‘निधर्मी राज्यांत सरकारने पूजाअर्चा करणे योग्य नाही’ म्हणून जनआंदोलन छेडले. त्याचा परिणाम म्हणून १९७१ मध्ये शासकीय पूजा झाली नाही.  बंद पडलेली शासकीय पूजा १९७३ पासून पुन्हा चालू झाली, ती आजतागायत चालू आहे. त्यासंबंधीच्या या काही मनो...

जागतिक आर्थिक मंदीचा धोका

Image
 जागतिक आर्थिक मंदीचा धोका  जागतिक वित्तीय संस्था काहीही सांगत असल्या आणि सकल उत्पन्न वाढीचे आकडे जाहीर करीत असले, तरी प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती अतिशय भयंकर आहे. सध्या जगभरात आर्थिक मंदीची भीती वाढत आहे. अर्थशास्त्रज्ञांच्या मते, येत्या एका वर्षात जगभरातील अनेक अर्थव्यवस्था सरकारी धोरणं आणि वाढत्या जीवनमानाच्या खर्चामुळं आर्थिक मंदीत प्रवेश करणार आहेत. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था, अमेरिका, तसंच युरोपीयन संघ, ब्रिटन, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा हे देश आर्थिक मंदीच्या गर्तेत सापडू शकतात. जगभरातील केंद्रीय बँका महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्याजदर वाढवत असल्याचं नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटलं आहे. जागतिक मानसिकतेची पर्वा न करता, मध्यवर्ती बँका त्यांची धोरणं अधिक कडक करत आहेत. एका संशोधन अहवालानुसार, जर रशियानं युरोपला होणारा गॅस पुरवठा पूर्णपणे बंद केला, तर युरोपीय देशांमधील मंदी आणखी गडद होऊ शकते. युरोपच्या अर्थव्यवस्थेला एक टक्के नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि दक्षिण कोरियासारख्या देशांमध्ये गृहनिर्माण क्षेत्र मोडकळीस आल्या...

Sri Lanka in mighty crisis

Image
 Sri Lanka in mighty crisis Sri Lanka's President Gotabaya Rajapaksa fled his official residence in Colombo on Saturday just before thousands of protesters broke through police barricades and stormed the compound. Immediately after that Prime Minister Ranill Wickramsinghe has tendered his resignation - leaving the country in tatters, rudderless without a proper leadership. Demonstrators from across the country arrived in buses, trains and trucks to Colombo earlier on Saturday to express outrage over the government's failure to protect them from economic ruin. Sri Lanka’s debt-laden economy has “collapsed” after months of shortages of food, fuel and electricity, The Sri Lankan economy is foundering under the weight of heavy debts, lost tourism revenue and other effects of the pandemic, as well as surging costs for commodities. The result is a country hurtling towards bankruptcy, with hardly any money to import gasoline, milk, cooking gas and toilet paper. Sri Lanka is unable to ...

ज्यांना आरे बद्दल काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी..👇

Image
 ज्यांना आरे बद्दल काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी..👇 'आरे' कारशेड बद्दल पसरवल्या जात असलेल्या अफवा आणि तथ्य..👇 *१. *अफवा* : 'आरे' हे एक जंगल आहे *तथ्य* : 'आरे' हे जंगल नाही. ही आरे महामंडळाची सरकारी जागा आहे. *२. अफवा* : संपूर्ण आरे नष्ट करत आहेत. *तथ्य* : आरे ही एकूण १६ स्केवर किलोमीटर आहे एवढी जमीन आहे. जवळपास २००० ते २५०० हेक्टर एवढी जमीन आरे ने व्यापली आहे. आणि त्यात मेट्रो कारशेड चा एरिया फक्त २७ हेक्टर एवढा आहे. *३. अफवा* : मेट्रो कारशेड साठी संपूर्ण आरेतील झाडे तोडत आहेत. *तथ्य* : आरेत एकूण ५ लाख वृक्ष आहेत, त्यातील मेट्रो च्या कारशेड मध्ये फक्त २२०० एवढी वृक्ष येत आहेत. एकूण झाडांच्या २२०० वृक्ष तोडले त्याच्या ७ पट वृक्ष लावलेले आहेत.  *४. अफवा* : आरेत हिंस्त्र वन्यजीव राहतात. (बिबट्या, वाघ, कोल्हा,)  *तथ्य* : आरे त कोणतेही वन्यजीव राहत नाहीत (पाळीव प्राणी असतात उदा. कुत्रा, भटक्या गाई म्हशी चरण्यासाठी येत असतात.) त्यामुळं सोशल मीडियात बिबट्या आणि झाडाचे फोटो वायरल होत आहेत ते फेक आहेत. *५. अफवा* :कारशेड हा आरेत च का आरे संपवण्याचा घाट आहे.? *तथ्य* : ...

DRDO's Swift Test gives a boost to India’s AMCA Stealth Fighter, Ghatak Combat Drone Project

Image
 BIG STRIDES IN DEFENCE CAPABILITIES  DRDO's Swift Test gives a boost to India’s AMCA Stealth Fighter, Ghatak Combat Drone Project: India has successfully tested its Autonomous Flying Wing Technology Demonstrator at the Aeronautical Test Range at Chitradurga, Karnataka, as announced by its Defense Research and Development Organization (DRDO) in a media statement released on July 1. With this test, India’s dreams of seeing its indigenous Ghatak (Lethal) Unmanned Combat Aerial Vehicle (UCAV) and fifth-gen AMCA fighter jet have come closer to realisation. “Operating in a fully autonomous mode, the aircraft exhibited a perfect flight, including take-off, waypoint navigation, and a smooth touchdown. This flight marks a major milestone in proving critical technologies towards the development of future unmanned aircraft and is a significant step towards self-reliance in such strategic defense technologies,” said the Indian Defense Ministry in a statement. The unmanned aircraft, also ...

आरे कॉलनी आणि मेट्रो शेड चे वास्तव

Image
 तथाकथित पर्यावरण चळवळ्यानो..........  जगात असे कोणते जंगल आहे जिथे खालील कामे केली जातात?  1) आधुनिक मॉर्डन बेकरी 2) कुक्कुटपालन केंद्र 3) आरे दूध डेअरी 4) शेकडो गाय, म्हैस तबेले 5) आरेतील अनेक युनिट्समध्ये अनेक शासकीय निवासस्थान 6) कृषी उद्योग केंद्र 7) अनेक ठिकाणी अनधिकृत झोपड्या 8) वनराई बिंबीसार कॉलनी, दूध सागर सोसायटी 9) 260 एकरमध्ये, रॉयल पाम्ससह उंच अनेक टेकड्या कापून आणि हजारो झाड तोडून उंच इमारतीची काम केली गेली आहेत 10) अदानीचे इलेक्ट्रिक स्टेशन 5 एकरांवर पसरले आहे. आता मला सांगा, सगळीकडे झाडी नव्हती का?  इथल्या झाडांनी ऑक्सिजन दिला नाही का??  260 मध्ये पसरलेल्या रॉयल पाममधील झाड तुम्ही कापले नाही का?  अवघ्या 4 महिन्यांपूर्वी रॉयल पाममध्ये 500 झाडे तोडून 3 मोठे स्टुडिओ बनवले, कसे?  कोणाच्या दयेवर???  लोकसंख्या वाढत असताना त्यानुसार वाहतूक सुविधाही वाढल्या पाहिजेत.  वरील सर्व क्रिया जगातील कोणत्या जंगलात होतात???  या कारशेडच्या ठिकाणी आरेतील इतर ठिकाणांपेक्षा कमी झाड आहेत, सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊन काम करण्यात आले आहे. ...

महाराष्ट्राचे सत्ता नाट्य : कोण जिंकले, कोण हरले?

Image
 महाराष्ट्राचे सत्ता नाट्य : कोण जिंकले, कोण हरले? देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे एक असं नाव होत ज्याने उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला हादरवून सोडलं होत. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे आणि फडणवीसांच्या खेळीमुळे उद्धव ठाकरेंकडून सत्तेसोबत पक्षही हातातून जाताना दिसत आहे. सत्तेच्या याच खेळात एक शायरी लक्षात येते. ती अशी की, 'मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना…मैं समंदर हूं लौटकर वापस आऊंगा'. पण शिवसेनाचा हा गेम करताना फडणवीसांना सुद्धा जाणीव नसावी की त्यांच्यासाठी काळाने पुढे काय ताट मांडले आहे. करत होतो एक पण झाले भलतेच अशी अवस्था त्यांची झाली. राज्याच्या राजकारणाला अनपेक्षितपणे मोठी कलाटणी देणारा निर्णय मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांच्या नावाच्या घोषणेने झाला. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी ऐनवेळी उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सर्वांना धक्का दिला.  राजभवनात झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते. या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांचेच अंदाज चुकवत महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करू शकणारी घोषणा केली. फडणवीस यांनी सांगितले ...

विधानसभा अध्यक्ष निवडणूक आणि विश्वासदर्शक ठराव

Image
 *विधानसभा अध्यक्ष निवडणूक आणि विश्वासदर्शक ठराव* 3 आणि 4 जुलैला महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी अभिनिमंत्रित केले आहे. अधिवेशनाचा मुख्य कार्यक्रम हा विधानसभा अध्यक्षांची निवड आणि मुख्यमंत्र्यांवरील विश्वासदर्शक ठराव हेच आहेत. त्या अनुषंगाने बऱ्याच प्रश्नांची चर्चा सगळीकडे सुरू आहे आणि बऱ्याच बाबतीत अनेकांचे मतभेद आहेत. त्यांचा माझ्यापरीने आढावा घ्यायचा प्रयत्न. ★पीठासीन अधिकारी कोण असेल? उत्तर - विधानसभेला पूर्ण वेळ उपाध्यक्ष असल्याने तोच पीठासीन अधिकारी म्हणून काम करेल. राज्यपाल आपला प्रतिनिधी देणार नाहीत.  ★अध्यक्षांची निवड कशी होईल? उत्तर- महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून अध्यक्षांची निवड ही गुप्त मतदान पद्धतीनेच होते. पण महाविकास आघाडी सरकारने विधिमंडळ अंतर्गत कामकाजाच्या नियमात बदल करून "हात उंचावून मतदान" पद्धतीने मतदान घेण्याचा नियम केला. तो सध्याच्या स्थितीत लागू असल्याने हात उंचावून (म्हणजे प्रत्यक्षात डोकी मोजूनच) होईल. आवाजी मतदानाने होणार नाही. त्यामुळे उपाध्यक्ष कोणत्याही प्रकारची मनमानी करू शकणार नाही. ★अध्यक्षांच्या निवडणु...

शेंडी जानव्याचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही..! 🔥

Image
🔥शेंडी जानव्याचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही..! 🔥                                                                             - उध्दव ठाकरे. उध्दवजी..     शेंडी जानव्याचं हिंदुत्व तुम्हाला कधीही कळणार नाही.. पेलवणारही नाही.. आणि पचणार तर नाहीच नाही..! कारण हा बुध्दिचा आणि चिंतनाचा विषय आहे..! एक जबाबदार नेतृत्व नात्याने हिंदु.. हिंदुधर्म आणि हिंदुत्व या तीन संकल्पनांचं आधी वाचन करा.. अभ्यास करा..! राजकीय नेतृत्व सर्वज्ञ असतं या अहं मानसिकतेतून आधी बाहेर पडा..  What I know is not Knowledge.. but What I do not know is Knowledge..! हे प्रामुख्याने लक्षात घ्या...! "माणसाला स्वतःच्या दोषांची जाणीव होणं हे त्याच्या शहाणपणाचे पहिले लक्षण असतं..!" असं विचारवंत रुदरफोर्ड म्हणतो..! त्यामुळे शरद पवार, सोनिया व राहुल गांधींच्या सावलीत वावरणार्या तुमच्याकडुन ही अपेक्षा करणं चूकीचं आहे...! ...

भारतीय गुप्तहेर संस्थेची सुरस आणि चमत्कारीक माहिती

Image
कुलभूषण जाधव हे रॉचे हेर नसल्याचे भारताचे म्हणणे आहे. ते खरेच मानावे लागेल. भारतीय गुप्तचर दुसऱ्या देशात कृष्णकृत्ये करीत नसल्याचेही परराष्ट्र खात्याचे म्हणणे आहे. पण त्यात तथ्य आहे? असेल, तर मग आपल्या गुप्तचर यंत्रणा नेमके करतात  तरी काय?.. पठाणकोटमधील दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीसाठी पाकिस्तानचे संयुक्त तपास पथक भारतात येण्याच्या ‘मुहूर्ता’वर पाकिस्तानने कुलभूषण जाधव हेरगिरी प्रकरण जाहीर करावे, येथूनच या प्रकरणाच्या खरेपणाबाबतच्या संशयाला सुरुवात होते. भारत आणि पाकिस्तानातील संबंध जरा कुठे सुरळीत होत आहेत, अशी शंका येताच भारतात मोठा दहशतवादी हल्ला होतो. या वेळी पाकिस्तानी लष्कराने जरा वेगळा मार्ग स्वीकारला आहे. यावेळी भारताच्या हेरगिरीचे प्रकरण पुढे आणले आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार कुलभूषण जाधव ऊर्फ हुसेन मुबारक पटेल हे रिसर्च अ‍ॅण्ड अनालिसिस िवग (रॉ) या भारतीय गुप्तचर संस्थेचे हेर आहेत. अलीकडेच पाकने त्यांच्या कबुलीजवाबाची ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध केली. त्यात त्यांनी आपण नौदल अधिकारी असून, रॉसाठी इराणमधून पाकिस्तानविरोधात दहशतवादी कारवाया करीत असल्याची ‘कबुली’ दिली आहे. मात्र त...

रँचो - चाचड उर्फ शरीन बलोच

Image
पाकिस्तानच्या कराची विद्यापीठात आत्मघातकी हल्ला करणाऱ्या महिलेचे नाव शरीन बलोच असे आहे. या स्फोटात तीन चिनी नागरिकांसह चार जणांचा मृत्यू झाला आहे. चायनीज लँग्वेज सेंटरजवळून एक चायनीज व्हॅन जात असताना महिलेने स्वत:ला उडवले. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हा हल्ला त्यांच्या फर्स्ट लेडी फिदायनने केल्याचे त्यांनी सांगितले. बीएलएने शरीन बलोचचे छायाचित्रही प्रसिद्ध केले आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) च्या पहिल्या आत्मघाती महिला बॉम्बरचा पती हॅबिटन बशीर बलोच फोटोत दिसत आहे. तिला दोन मुल सुद्धा होती... कराची विद्यापीठात चिनी नागरिकांना लक्ष्य करणारी शरीन बलोच उर्फ ​​ब्रमश कृत्या बड्डलबल तिचा पति बशीर बलोच म्हणाला की शरीच्या कृत्याने तो अवाक झाला आहे आणि त्याला अभिमान आहे. तिने हे कृत्य करण्या मागे कारण सांगितले जात आहे की तिच्या भावाला पाक आर्मी ने अमानुष छळ करून मारले .  शरीन एक उच्च शिक्षित होती . ■ तिने 2014 मध्ये तिचे B.Ed आणि 2018 मध्ये M.Ed पूर्ण केले. ती प्राणीशास्त्रात पदव्युत्तर पदवीधर होती.  अल्लामा इक्बाल मुक्त विद्यापीठाच्या तु...

लव, सेक्स और धोका

Image
 ◆● लव सेक्स और धोका ●◆ राहुल गांधी नेपाळ मध्ये 'हौउ  यांकी' यांच्या सोबत होते, असे बरेच लोक म्हणत आहेत. मी  काल टेलीग्राम वर प्रश्न ही विचारला होता.   ती Hou yanqi होती की नाही याबद्दल मला काही कल्पना नाही आणि आत्ताच कोणी ही खात्रीशीर सांगु शकणार नाही... पण त्याचा अनुकरण केलेला चीन इतका भोळा नाही हे मी माझ्या चीन विषयीच्या अभ्यासावरुन सांगू शकतो... की तो एका पेक्षा अधिक  लक्ष्या साधन्यास समान संसाधन वापरेल अस नाही वाटत ...कारण  " Espionage World " मध्ये कुठची ही गुप्तचर एजन्सी तीच ट्रिक तीच ' honey ' परत परत वापरत नाहीत...आणि ही  'Hou yanqi' तर नेपाळ मधल्या तिच्या कांडा वरुन फेमस झाली आहे. म्हणून   त्यांनी राहुल गांधींना मोहीत करण्यास  दुसऱ्या एजंटचा वापर केला असावा...? ◆ अचार्य चाणक्यानी मदमस्त धनानंदचे राज्य उलथून टाकण्या करता जगात प्रथम विष कन्याचा वापर केला होता ...आजच्या युगात त्याला 'honey trap' म्हणतात. प्रत्येक शक्तिशाली देश काही प्रभावशाली ग्रुप चालवतात 【जसे यूएस मध्ये सीआईए व FBI】जर तुम्ही त्या त्या देशातील काही विशिष्ट ग...