मालमत्ता करप्रणाली हाणून पाडणार!
मालमत्ता करप्रणाली हाणून पाडणार! मालमत्ता कराच्या नव्या प्रणालीसाठी स्वयंमूल्य निर्धारणाचे अर्ज भरण्यासाठी ठाणेकरांकडून थंड प्रतिसाद मिळत असताना ही करप्रणाली हाणून पाडायची असा निर्धारच शनिवारी ठाणे महापालिकेच्या सभागृहात झालेल्या एका चर्चासत्रात ठाण्यातील मान्यवरांनी केला . निमूटपणे कर भरणाऱ्यांवरच जादा कराचा बोजा पडणार असेल तर त्याविरोधात हायकोर्टात धाव घेण्याचा निर्णयही यावेळी झाला . या पवित्र्यामुळे नव्या करप्रणालीचे भवितव्य अंधारात सापडले आहे . भांडवली मूल्यावर आधारित नव्या करप्रणालीच्या विषयावर ठाणे डिस्ट्रिक्ट को ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे यांनी पालिकेतील नरेंद्र बल्लाळ सभागृहात शनिवारी चर्चासत्राचे आयोजन केले होते . पत्रकार मिलिंद बल्लाळ , अॅड प्रशांत पंचाक्षरी , कर सल्लागार संजय अंबार्डेकर आणि आर्किटेक्ट उल्हास प्रधान , पालिकेचे माहिती व जनसपर्क अधिकारी संदीप माळवी , प्रभारी कर निर्धारक वर्षा दीक्षित आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते . या कराचा दर ( टॅक्स रेट ) अद्याप ठरलेला नाही . महासभेत त्याचा निर्णय होणार आहे . नवी कर प्रणाली लागू झाल्यावर ...