छत्रपतींचे शिवाजी महाराजांचे मनोगत
छत्रपतींचे मनोगत नमस्कार...!! मी महाराज शिवाजीराजे भोसले बोलतोय. सर्वात प्रथम खूप सारे धन्यवाद..!! Birthday wishes बद्दल. हाहा !! अहो दचकू नका. मी सुद्धा आता modern झालोय. तुम्हीच सारखे म्हणता शिवाजी महाराज जन्माला यावे यावे....अहो कित्येक जन्म घेतले मी पण तुम्ही मला ओळखलेच नाही. दाभोळकरांच्या रुपाने मीच जन्म घेतला होता. अंधश्रद्धा निर्मूलन करायला गेलो पण तुम्हीच मला मारून टाकले. आमटे कुटुंब हे माझेच अवतार. दचकू नका, कारण शिवाजी महाराज म्हणजे केवळ युद्ध करणारा राजा नाही. प्रजेच्या कल्याणासाठी जो झगडतो तोच शिवाजी महाराज. नीरजा भानोत च्या रुपाने जन्म घेऊन अनेक लोकांचे प्राण वाचविले. कर्तव्यदक्ष पोलीस आणि भारतीय सेना हे माझेच अवतार. तुम्ही मला किल्ल्यांवर शोधत बसलात म्हणून कदाचित मी तुम्हाला सापडलो नसेन. परवा सहज म्हणून किल्ल्यांवर फिरायला गेलो तर तिथे मला गौरवशाली इतिहासापेक्षा तिथल्या भिंतीवर, दगडांवर रमेश , प्रिया, रोहन, शीला, करण, पूजा वगैरे मंडळीच जास्त दिसली. गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारे दगड खूप तक्रार करत होते तुमच्याबद्दल. वाईट वाटले फार. राजा म्हणू...