An apple a Day keeps Doctor away "- *एक शुध्द फसवणूक
"An apple a Day keeps Doctor away "- *एक शुध्द फसवणूक.* 😳😳😳😳 १. सफरचंद या मातीतील नव्हेच ! भारतातील केवळ हिमाचलप्रदेश आणि काश्मीर या दोन राज्यांत लागवड होऊ शकणारे सफरचंद हे फळ आज सर्व राज्यांत बाराही महिने उपलब्ध आहे. त्याचे झाड कसे दिसते ? त्याची पाने कशी असतात ? फुलोरा कसा असतो ? यांविषयी आम्हाला काहीही माहिती नाही; कारण ते मुळात भारतातील फळच नाही. इंग्रजांनी आपल्या समवेत ते भारतात आणले आणि या दोन राज्यांतील अती थंड वातावरण त्या फळाला पोषक असल्याने, ते झाड येथे राहिले, जसा चहा राहिला ! २. आरोग्यदृष्ट्या अत्यल्प उपयोगी, तरी केवळ व्यापारी गुणधर्मामुळे जगभर प्रसिद्ध पावलेले फळ अन्य फळांप्रमाणे सफरचंद कच्चे कधी, पक्के कधी, हे कळत नाही; कारण त्याचा रंग, रूप, वास आणि चवही पालटत नाही. अन्य कोणतेही कडक फळ पिकल्यानंतर मऊ होते, उदा. कैरीचा आंबा होतो किंवा मऊ फळ पिकल्यावर टणक होते, उदा. मऊ शहाळ्याचा टणक नारळ होतो. केवळ अधिक काळ टिकणे, या सफरचंदाच्या व्यापारी गुणधर्मामुळेच ते जागतिक स्तरावरील फळ झाले आहे. प्रत्यक्षात त्या फळात कोणतेही विशेष औषधी गुणधर्म नाहीत. भारतीय फळांमध्ये मात...