गंमत ४ ची
गंमत ४ ची 1) औषधोप४ २) मानसोप४ 3) प्रथमोप४ 1) समोप४ 2) पाहुण४ 3) सदवि४ 4) दूरवि४ 1) सं४ 2) वि४ 3) आ४ 4) प्र४ 5) ला४ 1) सदा४ 2) समा४ 3) शिष्टा४ 4) भ्रष्टा४ 5) अत्या४ 6) सुवि४ 7) उप४ 8) अवि४ 9) कुवि४ 10) हिंसा४ थोडी कडू थोडी गोड पण जिला नाही तोड अशी ही चौपदरी कथा आहे ! चारची खरी बाजू ' चार ' दिशेत आहे ! ' चार ' खांबांशिवाय घर बांधता येत नाही. ' चार ' गोष्टी शिकल्याशिवाय शहाणपणा येत नाही. ' चार ' चौघात जे बोलू नये ते बोलले की गालावर ' चार ' बोटे उमटल्याशिवाय राहत नाहीत. ' चार ' शब्द सणसणीत सुनावणे म्हणजे कानाखाली ' चार ' आवाज काढण्या सारखेच असते. चौघे म्हणजे जणू ' चार ' वेद आणि यांनी एकमेकास गुणिले की दुप्पट उपनिषदे होतात. ' चार 'चा 'वर्ग' केला की माणूस तरुण होतो अन सोळाव्या वर्षात पाऊल ठेवतो. "चार"च्या 'वर्गा'स पुन्हा "चार"ने गुणले की जगातल्या सर्वात 'बुद्धि'मान खेळातले चौसष्ट घरांचे 'बळ' मिळते ! यांची टीका ही ' चौफेर ' अस...