शेतजमीन विषयक "फेरफार" भाग-2
शेतजमीन विषयक महत्वाच्या संज्ञाः भाग-2 "फेरफार" शेतजमीन विषयक कामात फेरफार हा शब्द बर्याचदा आपल्या कानी पडतो पण बहुतांश लोकांना फेरफार म्हणजे नेमके काय, त्याचे प्रकार, फेरफार नोंदी याविषयी काहीच माहिती नसते. तर चला आजच्या लेखात आपण फेरफार बद्दल अधिक जाणुन घेऊया. फेरफार म्हणजेच गाव नमुना नं. 6 मधील नोंदी, याचाच अर्थ जमीन हक्क संपादन पत्रक आणि फेरफार नोंदवही. या नोदवहीमध्ये सदर जमीनीचे सर्व व्यवहार, वारस, खरेदीविक्री तारीख, खरेदी रक्कम, इत्यादी संबंधीत परीपुर्ण माहितीची नोंद असते. याच फेरफार नोंदवहीतल्या नोंदी आपल्या 7/12 वर येतात. 7/12 वर कोणतीही नोंद घेण्यापुर्वी फेरफार नोंद केली जाते. गावदप्तरी याला गाव नमुना नं. 6 फेरफारची नोंदवही म्हटले जाते, अनेकदा याला नमुना 'ड' सुद्धा म्हणतात. फेरफारची नोंदवही ही एकप्रकारे फेरफारची दैनंदिनीच आहे. जमीनीच्या मालकी अधिकारात जसाजसा बदल होत जातो, त्याच क्रमाने यात नोंदी होत जातात. या गावनमुना फेरफार नोंदवहीत वेळीच नोंदी न घेतल्या गेल्यास सदर जमीन मालकाच्या अडचणी अनेकपटीनी वाढु शकतात. फेरफार नोंदवही ( गाव नमुना नं. 6 ) चे मुख्यतः चार...