सावधान - धोकादायक अमूल मसाला डोसा
सावधान - धोकादायक अमूल मसाला डोसा * संध्याकाळच्या वेळी तुम्ही रस्त्यावर फिरताय. जाता-जाता कानावर चर्र-चर्र असा आवाज येतो, तुमची नजर सहाजिकच तिकडे वळते. समोर डोस्याचा स्टॉल दिसतो, बाहेर लावलेल्या तव्यावर एक माणूस डोस्याचं घाऊक प्रमाणात प्रोडक्शन करत असतो. लोकं डोसे, उत्तप्पा खात उभे असतात. स्टॉलवर चकाचक रंगीबेरंगी नेमप्लेट असते. डोक्याला टोपी, अंगात दुकानाच्या ब्रँडचा टी-शर्ट घातलेल्या माणसांची कामाची लगबग सुरु असते. ते दृश्य पाहून तुमची नजर क्षणभर तिथेच खिळून राहते. कानावर पडलेला तो आवाज, डोळ्यांनी पाहिलेला नजारा आपल्याला मधल्या वेळेच्या भुकेची जाणीव करुन देतो. तुम्ही तिथेच थबकता आणि पटकन एका ‘अमूल मसाला डोस्याची’ ऑर्डर देऊन टाकता. आता ‘अमूल’चाच डोसा का? आजच्या मुन्नाभाईच्या भाषेत बोलायचं तर, “बोलेतो मसाला डोसा किंवा पावभाजी फक्त ‘अमूलचेच’ असतात. तुम्ही सेल्फ सर्व्हिस काऊंटरला पैसे देऊन टोकन घेऊन कारागीराकडे देत,“भैय्या अमूल जरा ज्यादा डालना, क्या? ” अशी ऑर्डर देता. तवा कारागीर तुमच्याकडे आज्ञाधारक नजरेने बघत, समोरच्या टेबलावरच्या अमूल लोण्याच्या मोठ्या पॅकमधून आपला सु...