Posts

Showing posts from June 26, 2016

वॉटसपचा वापर

-- वॉटसपचा वापर -- वाॅट्सअप वर अनेक नवनवे समूह बनतात. अनेक समूहात तेच तेच लोक सगळीकडे सामाईक असतात. त्यामुळे मजकूरही तोच तोच वाचावा लागतो. वॅाट्सअपचा नेमका वापर कसा करावा, याबाबतीत मात्र बहुतांशी लोक गोंधळलेले दिसतात. सगळ्यांनी मोबाईलवर टाकलंय म्हणून आपणही वॅाट्सअप घेतलेलं असतं. एकदा नंबर लोकांकडे गेला की धडाधड संदेश यायला सुरुवात होऊन, आपण त्या चक्रव्युहात कधी गुरफटून जातो, आपलं आपल्यालाच कळत नाही. त्याचं कारण एकच. गंतव्य स्थान निश्चित असल्याशिवाय गाडीत बसायचं नसतं किंवा गाडी सुरु करायची नसते. जायचं कुठे, निश्चित नसेल तर गाडी गोल गोल फिरत राहते, पेट्रोल जाळत, कोणत्याही उद्दिष्टाशिवाय... ज्यांना काहीच सुचत नाही, ते सगळ्यात जवळचा पर्याय म्हणजे, गुड मॉर्निंग, गुड नाईट चा स्वीकारतात. मधल्या काळात काय करायचं म्हणून इतरांचा आलेला मजकूर कॉपी-पेस्ट, शेअर, फॅारवर्ड करतात. गुड मॉर्निंग, गुड नाईट वैयक्तिकरित्या करा, पण समूहात अजिबात नको. यामुळे इतरांना काय मनस्ताप होतो, याची जाणीव कोणी ठेवत नाही. अनेक चांगले लोक या प्रकारांना कंटाळून समूह सोडणे पसंत करतात. शिवाय, असले फुटकळ संदेश पाठवणारे ...

Kudos to #Modi, India becomes member of MCTR

India become the member of MCTR while China is not. A great success after The wait of  35 Year. A great effort of Modi Ji in international diplomacy. Now India can export Missile to other nation more then 300 km.while China cannot.but Indian media display only unsucess in NSG due to China.but this is also a victory for India because now India got the support of 44 in 45 nation which include 4 supper power USA;Russia France n  England. now India will get be defecto  state  in NSG and can get all power of nuclear state. Even China Veto will be useless. This is Chankya niti of Sri Modiji. Jai Ho n Vande Matram...🇮🇳

#Brexit and after effects

ब्रिटनमध्ये होत असलेल्या जनमत चाचणीचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर झाला आहे. कारण मुंबई शेअर बाजार उघडताच, सेन्सेक्स तब्बल 900 अंकांनी  गडगडला आहे. सेन्सेक्स काल 27002 अंकांवर बंद झाला होता, आज उघडताच तो 26367 अंकांवर जाऊन पोहोचला. दुसरीकडे पौंडनेही 31 वर्षातील निच्चांक गाठला, डॉलरच्या तुलनेत 9 टक्क्यांनी घसरला. ब्रिटनने युरोपियन युनियनमध्ये राहावं की नाही, यासाठी तिथल्या नागरिंकांनी काल मतदान केलं आहे. या जनमत चाचणीचा निकाल  आज आहे. हा निकाल जगाच्या राजकारण आणि अर्थकारणावर दूरगामी परिणाम करणारा ठरू शकतो. युरोपियन युनियनमध्ये रहावं, की नाही यावर ब्रिटनमध्ये खल सुरू आहे. ही लढाई इतकी पेटली आहे, की त्यात मजूर पक्षाच्या खासदार जोआना कॉक्स यांचा जीव गेला. त्या धक्क्यातून सावरून ब्रिटनच्या नागरिकांना आपलं भवितव्य ठरवायचं आहे. *काय आहे युरोपियन युनियन?* 28 देश आणि 50 कोटी लोकसंख्येच्या युरोपियन युनियनची अर्थव्यवस्था 16 खर्व डॉलर्सची असून तिचा जागतिक डरडोई उत्पन्नातला वाटा एक चतुर्थांश इतका आहे. युरोपियन युनियनमधील नागरीक सदस्य देशात व्हिसाशिवाय मुक्तपणे प्रवास, व्यापार, नोकरी...

What is NSG ?

NSG म्हणजे काय? गेली अनेक वर्षे भारत NSG किंवा न्युक्लिअर सप्लाइज ग्रुपमध्ये स्थान मिळवण्यासाठी झटत आहे. अमेरिकेपाठोपाठ मेक्सिकोनेही भारताला या ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यासाठी पाठिंबा दर्शवला आणि भारताचं आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्व अधोरेखीत झालं. काय आहे NSG? आणि भारतासाठी हा ग्रुप का महत्त्वाचा आहे हे जाणुन घेऊया 1974 मध्ये भारताने अणू चाचणी केली आणि त्या नंतर अमेरिका, रशिया, कॅनडा, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, जपान आणि इंग्लंड या सात देशांनी न्युक्लिअर सप्लाइज ग्रुप स्थापन केला. या समूहाचा उद्देश होता, अणू तंत्रज्ञान आणि आण्विक शस्त्रास्त्रांच्या प्रसाराला आळा घालणे. मुख्यत: भारताला अणूतंत्रज्ञान मिळू नये हा उद्देश NSG च्या स्थापनेमागे होता. 1975 ते 1978 या कालावधीत लंडनमध्ये अनेक बैठका पार पडल्या आणि कशाची निर्यात कुठल्या देशाला करता येईल, कुणाला करता येणार नाही आदी बाबींवर निर्णय घेण्यात आले. त्यानंतर 1991 पर्यंत NSG ची बैठक झाली नाही. 1991 च्या पहिल्या आखाती युद्धानंतर हा ग्रुप पुन्हा सक्रिय झाला. आजच्या घडीला या ग्रुपमध्ये 48 सदस्य देश असून बहुतांश देश युरोपीय खंडातले अ...