बलात्कार - एक मानसिक विकृती
बलात्कार - एक मानसिक विकृती सध्या देशात उन्नाव, कथुआ, आसाम वगैरे ठिकाणी अल्पवयीन मुलींवर व स्त्रियांवर झालेल्या दुर्दैवी बलात्काराच्या घटनांनी एकच काहूर माजला आहे. हे सर्व प्रसंग कोणत्याही पुरोगामी समाजाला लाजिरवाणे आहेत व त्यांचे कठोर शब्दांने व क्रुतीने खंडण केले पाहिजे. बलात्कार हा बाईवर झालेला एक हिंसक हल्ला आहे आणि बलात्कार करणारा पुरुष हा गुन्हेगार आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. बलात्काराचे प्रकार का घडतात ? बलात्कार ही मानसिक विकृती आहे. स्वतःच्या शरीरसुखासाठी, स्वार्थासाठी, सूड उगवण्यासाठी स्त्री देहाचा वापर, स्त्रीला उपभोगणं ही बलात्कार होण्यामागची मानसिकता दिसून येते. दंगलीमध्ये झालेले बलात्कार किंवा जातीय द्वेषातून झालेले खैरलांजी प्रकरण - यावरून आपल्याला दिसते की, जातीय-धार्मिक द्वेष, बदला, सूड व्यक्त करण्यासाठी, एखाद्या समुदायावर नियंत्रण आणण्यासाठी स्त्रियांवर अत्याचार केले जातात. बलात्कार हे हत्यार म्हणून वापरलं जातं. असे सूड म्हणून केले गेलेले सामूहिक बलात्कार, दंगलीतले बलात्कार हे कळत नकळत विशिष्ट समुदायांकडून छुप्या पद्धतीने गौर...