Posts

Showing posts from April 10, 2016

How to introspect oneself ?

स्वतःला उलगडून पहाताना काय काय वाचायचं आणि काय काय ऐकायचं ना? ह्या सगळ्या गडबडीत आपला आपल्याशी संवाद व्हायचा तो राहून जातो. गोळा बेरीज करता करता एखादी मूळ गोष्ट हरवावी तशीच. एका बाजूला एकात्म म्हणायचं नुसतं आणि बाकी सगळा वेळ आपण कसे वेगळे आहोत हे सिद्ध करण्यासाठी घालायचा. आपण आपला अस्तित्व समजून घ्यायला सुरुवात केली कधी ना कधी शून्याकार येणार असतो. पण तो कदाचित नको असतो आपल्याला. आपल्यालाच देव कसा भेटला ह्यातच समाधान मानणारे आपण. येथेही खाडाखोड केल्याशिवाय आपण काही एकमेंकांना सामोरे जात नाही. अंशातला अंश शिल्लक ठेवण्यात यथार्तता वाटते. निराकारपण आकारात बदलावा असे वाटत रहावे. दिसू शकणारे दृष्टी लाभलेले बाकी सगळे कसे आंधळे ह्याचा प्रमेय मांडण्याची धडपड काही सुटत नाही. आपलं पाहणं पडताळून घ्यावं अगदी अनुभवाच्या कसोटीवर तोलून मापून घ्यावं. शेवटी आपल्यात होणारा बदल आपल्यालाच जाणवावं इतकं पाहणं आपल्याला शक्य आहे म्हणा. ह्याच्या पलीकडे पहायला कदाचित अजून काही प्रयत्न करावे लागतील. एकदा खोलात शिरलं की जाणवायला सुरवात होते. आपल्या मनात असलेला आकार सूक्ष्म होत जातो. काय जग आहे ना एका...

Who really wrote the Indian Constitution?

भारताचे संविधान कुणी लिहिले ??? या प्रश्नाचं उत्तर जवळपास सर्वमान्यच  आहे ते म्हणजे... भारताचे संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले. परंतु सहज माझ्या मनात आले की फ़क्त "एका व्यक्तिसाठी" इतक मोठं तर्कसंगत, सुटसुटीत, कायदेशीर लिखाण  करणं शक्य आहे का?... ते पण केवळ 3 वर्षाच्या कालावधीत ... म्हणजेच संविधानिक सभेच्या स्थापने पासून (9 डिसेम्बर 1946) ते संविधान अंगीकृत करेपर्यंत (26 नोहेम्बर 1949). मला हे पूर्णपणे पटलं नाही की केवळ आंबेडकरांनी संविधान लिहिलं. त्यामुळे इतिहास शोधण्यास सुरुवात केली व खालील माहिती माझ्या हाती लागली ती तुमच्यासोबत share करतोय... 1947 ची फाळणी योग्य रितीने व अहिंसेने व्हावी यासाठी ब्रिटिशांनी 'द इंडिपेंडेंस एक्ट 1947' भारत व पाकिस्तानला दिला, ज्यानुसार दोन्ही देशांना आप-आपली संविधान बनवण्यासाठी स्वतंत्र संविधानिक सभा (constituent assembly) बनवण्याचे अधिकार दिले. यानुसार भारताने आपली संविधानिक सभा 9 डिसेम्बर 1946 ला बनवून पहिली बैठक घेतली. या संविधानिक सभेत असे ठरवण्यात आले की संविधान "लिहिण्याचे काम" एका व्यक्तीच्या आवाक्या बाहेरच...