जन्माला यावं आणि एकदा तरी इंदौरला जाऊन सराफा आणि ५६ दुकानांच्या पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घ्यावा.
निवडणूक प्रचारा निमित्ताने इंदोर ला जाणे झाले. तेथील हा अविस्मरणीय अनुभव. जन्माला यावं आणि एकदा तरी इंदौरला जाऊन सराफा आणि ५६ दुकानांच्या पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घ्यावा... ते जर जमलं नाही तर आपलं आयुष्य फुक्कट वाया गेलं असं समजावं आणि धोकटी खांद्याला अडकवून वाट चालायला सुरुवात करावी... पैलं म्हणजे इंदौरी पोहे... कोथिंबीर, बारीक इंदौरी शेव, ओलं खोबरं आणि डाळिंबाचे दाणे पसरलेले... नंतर विकास स्वीट्सची टमटमीत फुगलेली एक दाल कचौरी आणि एक आलू कचौरी खावी आणि तिथंच भल्यामोठ्या लोखंडी कढईत असं झक्कासपैकी ऊकळत असलेले, वरुन असं लालबुंद केशर तरंगत असलेले, बदाम, पिस्ते, काजू भरपूर असलेले, चार चमचे दाट केशरी साय ग्लासात वरुन पांघरलेले केसरिया दूध ग्लासभर प्यावे... जोशींचा हवेत फेकून परत झेललेल्या दहिवड्याला मोक्ष द्यावा... हे जोशी, एकाच हाताच्या प्रत्येक बोटाची चिमूट करुन त्या पाच चिमूटीत पाच प्रकारचे मसाले पकडून... एकेक करत दह्यावर सोडतात आणि अशी मस्त नक्षी बनवतात... (जसं सीसीडी मधे कॉफीवर नक्षी बनवतात ना तसं)... जोश...