*"ने मजसि ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला"* या गीतास १०८ वर्षे पुर्ण झाली.
१० डिसेंबर २०१७ आजच्या दिवशी सावरकरांनी रचलेल्या *"ने मजसि ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला"* या गीतास १०८ वर्षे पुर्ण झाली. १९०९ सालच्या १० डिसेंबरला ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर आपला मुलगा गेला हे समजल्यावर धिरोदात्त वृत्तीने हुंदक्या ऐवजी तोंडामधून बाहेर पडले काव्य. सावरकरांचं सागरसूक्त - ने मजसी ने परत मातृभूमीला ! १०८ वर्षांपूर्वी म्हणजे, १० डिसेंबर, १९०९ साली हिंदुह्रदयसम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर ने मजसी ने परत मातृभूमीला ह्या कवितेची रचना केली. मातृभूच्या विरहार्थ रचलेल्या ह्या अद्वितीय काव्याचं चिंतन हे सावरकरांच्या अत्युत्कट नि प्रखर राष्ट्रभक्तीचं द्योतक आहे ! हिंदुस्थानच्या इतिहासात एवढ्या अलौकिक मातृभूच्या विरहाचं यथार्थ चित्रण अन्यत्र क्वचितच सापडेल ! क्रांतिकारकांचे मुकुटमणी असलेल्या सावरकरांच्या नवनवोन्मेषशालिनी अशा प्रतिभेला फुटलेले हे धुमारे हे सावरकरांच्या प्रतिभासंपन्नतेचे जसे चित्रण करतात, तद्वतच त्य...