तामिळनाडू मधील तंजावरच्या मराठा साम्राज्याचा भव्य दिव्य इतिहास
आता पर्यंत झाकून ठेवलेला "तामिळनाडू मधील तंजावरच्या मराठा साम्राज्याचा भव्य दिव्य इतिहास" :- 1 श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे सख्खे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे हे तंजावरचे पहिले मराठा राजे होते. 2 श्रीमंत शहाजी राजांनी ही सत्ता व्यंकोजी राजे यांना मिळवून दिली होती. चेन्नई जवळच्या जिंजीचा किल्ला हा मराठा साम्राज्याचा भाग होता. 3 तंजावरचे मराठा साम्राज्य एकूण 180 वर्षे टिकून होते. 180 वर्षात एकूण 10 राजे होऊन गेले. 4 सन 1832 मध्ये तिसरे शिवाजी यांची सत्ता ब्रिटिशांनी बरखास्त केली. हे तंजावरचे शेवटचे मराठा राजे होत. 5 सातारा, कोल्हापूर प्रमाणे आजही तंजावर येथे भोसले संस्थानिक आहे. 6 तंजावरच्या मराठा राजवटीतील सर्वात शूर व विद्वान राजा म्हणजे पहिले "सरफोजी" होय. 7 तंजावरचे मराठा साम्राज्य विद्वत्ता व कला संपन्न होते. 8 तेथील मराठा राजांनी 50 हून अधिक विविध विविध ग्रंथ लिहिले असून, त्यात 12 दर्जेदार नाटके आहेत. 9 यातीलच एक मराठी नाटक रंगमंचावर तंजावर येथे सादर केले गेले, ते रंगमंचावरील पहिले मराठी नाटक होय. 10 राजा चोळ याने बांधलेल्या बृहदेश्वर राजराजेश्वर मंदिराच्या भी...