सायबर फ्रॉड चे कारण तो एक बेसावध क्षण
एक बेसावध क्षण आणि ८६ हजार रुपये गेले पाण्यात ! सायबर फ्रॉडचा अजून एक प्रकार माहित नाही काय ते मात्र सायबर फ्रॉडच्या आजवर इतक्या केसेस पाहिल्या त्या सर्वामध्ये एक कॉमन धागा आहे. तो म्हणजे एक बेसावध क्षण !! मग तो हॅकरकडून आलेला कॉल असेल किंवा आलेला मेसेज असेल. हमखास आपल्यापैकी अनेकजण त्या क्षणी हिप्नोटाईज झाल्यासारखे होतात अन घोळ होतो. आणि मग नंतर जेव्हा कळत तेव्हा खूप उशीर झालेला असतो. "के वाय सी" फ्रॉड या प्रकारावर मागेही मी एक पोस्टमधून प्रकाश टाकला होता. सावधही केलं होत. पण काय माहित लोक वाचतात की नाही ? तेच कळत नाही. नुकताच त्याच प्रकारच्या सापळ्यात मित्र अडकला अन थोडेथोडके नाही तर ८६ हजार रुपये गेले पाण्यात ! या फ्रॉडबद्दल आता पुन्हा एकदा सांगतो. शिवाय सोबत त्याचे स्क्रीन शॉट देखील देतोय. त्यातले हॅकर मेसेज नीट लक्षात ठेवा. अमुक तमुक बँकेतून हा मेसेज तुम्हाला आला असून तुम्ही तुमचे केवायसी अपडेट केलं नाही. ते लगेच करा अन्यथा तुमचं अकाउंट ब्लॉक करण्यात येईल. असं सांगून एक लिंक दिली जाते. त्या लिंकवर क्लिक केल्यावर पुढं ते जसजसे सू...