*'ळ' अक्षर नसेल तर*
➰ 〰 ➿ 〰 ➰ *'ळ' हे अक्षर असलेली जगातली एकमेव भाषा म्हणजे आपली मराठी...!!!* आणि म्हणूनच ह्या भाषेच्या समृद्धतेचा आम्हाला गर्व आहे! *'ळ' अक्षर नसेल तर* पळणार कसे वळणार कसे तंबाखू मळणार कसे दुसर्यावर जळणार कसे भजी तळणार कशी सौंदर्यावर भाळणार कसे पोरं-टोरं तळयात-मळ्यात खेळणार कशी तीळगूळ कसा खाणार ? टाळे कसे लावणार ? बाळाला वाळे कसे घालणार खुळखुळा कसा देणार घड्याळ नाही तर सकाळी डोळे कसे उघडणार ? घड्याळ बंद पडले तर पळ कोण मोजणार वेळ पाळणार कशी ? मने जुळणार कशी ? खिळे कोण ठोकणार ? तळे भरणार कसे ? नदी सागरला मिळणार कशी ? मनातली जखम भळाभळा वाहणार कशी हिवाळा,उन्हाळा, पावसाळा नाही उन्हाच्या झळा नाही त्या निळ्या आभाळातून पागोळ्या खळाखळा ! कळी कशी खुलणार ? गालाला खळी कशी पडणार ? फळा, शाळा मैत्रिणींच्या गळ्यात गळा सगळे सारखे, कोण निराळा? दिवाळी, होळी सणाचे काय ? कडबोळी,पुरणपोळी ओवाळणी पण नाही ? तुम्ही काय चिंचपोकळीला रहाता ? भोळा सांब , सावळा श्याम जपमाळ नसेल तर कुठून रामनाम ? मातीची ढेकळे नांगरणार कोण? ढवळे पवळे बैल जोततील कोण?