जानवे म्हणजे नेमके काय ?...
जानवे म्हणजे नेमके काय ?... ◆जानव्याला पहिल्या तंतूवर ओमकार असतो ◆दुसर्यावर अग्नी असतो ◆तिसर्यावर नवनाग असतो ◆चौथ्यावर सोम ◆पाचव्यावर पितर ◆सहाव्यावर प्रजापती ◆सातव्यावर वायू ◆आठव्यावर सुर्यनारायण ◆नवव्यावर विश्वदेव त्याचे तिन तंतूंचे पिळ असतात असे एकूण नऊ दोरे असतात असे नऊ सुत्रिचे(तंतू) तिन पदर म्हणजेच •सत्व•रज•तम• हे तिन गुण मिळवून 96 आन्गुळे दोरा लाबं असतो. (जानवे ९६ बोटे लांब असते असा उल्लेख आहे यांत तुमच्या संमतीने थोडा बदल सूचवितो तो असा... शहाण्णव चौंगे ( एक चौंगा = चार अंगुळे )लांबी असलेल्या सूतास कोठेही न तोडता त्रिगुणीकरण करून त्यास ब्रह्मगाठ मारून यज्ञोपवीत अर्थात जानवे तयार केले जाते..यांत सुत म्हणजेच सुक्ष्मतंतू किंवा मुख्य धागा होय..! देवतान्यास करतांना तंतू हाच शब्द वापरतात....! जानवे हे बेंबीपर्यंतच असावे..कमरेच्या खाली जाऊ नये असा संकेत आहे...! तीन पदरावर तीन वेद व ब्रह्मगाठीवर अथर्ववेद असतो अशी संकल्पना आहे..!तसेच सामुद्रिक शास्त्रात पुरूषाचे प्रमाण स्वत:च्या अंगुळांनी ८४ ते १०८ पर्यंत असते...त्यांची सरासरी ९६ अंगुळे येते..खांद्यापासून बेंबी किंवा ...