शेंडी जानव्याचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही..! 🔥

🔥शेंडी जानव्याचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही..! 🔥                                                    

                        - उध्दव ठाकरे.



उध्दवजी..

    शेंडी जानव्याचं हिंदुत्व तुम्हाला कधीही कळणार नाही.. पेलवणारही नाही.. आणि पचणार तर नाहीच नाही..! कारण हा बुध्दिचा आणि चिंतनाचा विषय आहे..! एक जबाबदार नेतृत्व नात्याने हिंदु.. हिंदुधर्म आणि हिंदुत्व या तीन संकल्पनांचं आधी वाचन करा.. अभ्यास करा..! राजकीय नेतृत्व सर्वज्ञ असतं या अहं मानसिकतेतून आधी बाहेर पडा.. 

What I know is not Knowledge.. but What I do not know is Knowledge..! हे प्रामुख्याने लक्षात घ्या...!

"माणसाला स्वतःच्या दोषांची जाणीव होणं हे त्याच्या शहाणपणाचे पहिले लक्षण असतं..!" असं विचारवंत रुदरफोर्ड म्हणतो..! त्यामुळे शरद पवार, सोनिया व राहुल गांधींच्या सावलीत वावरणार्या तुमच्याकडुन ही अपेक्षा करणं चूकीचं आहे...!

    तुमच्यासाठी हे वरील वाक्य टाळ्या घेणारं निर्बुध्द उथळ जरी असलं तरी त्याचा आशयगर्भ अर्थ जाणुन घेण्यासाठी सखोल अभ्यासाची तुम्हाला नितांत आवश्यकता आहे..!"शेंडी जानवं" ही अभ्यास, साधना व तपश्चर्येची उपलब्धी आहे..! ही केवळ "ज्ञाती" नसून ही कठोर "प्राप्ति" आहे..! "गणिका गर्भ संभूतः | वसिष्ठस्तु महामुनि: | तपस्या विप्रत्व मायातः | संस्कारस्तत्र कारणम् ||" 

- वेश्येच्या उदरी जन्म पावुनही वसिष्ठ अभ्यास, साधना व तपश्चर्येने विप्र (ब्राह्मण) झाले..! मान व जन्माचे सार्थक होण्यासाठी जन्मापासूनच  सुसंस्कारांची आवश्यकता असते हे आधी समजून घ्या...! "आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही..!" म्हणता नां..! मग "हिंदुत्व" म्हणजे नेमकं काय हे कळण्यासाठी.. जाणुन घेण्यासाठी.. आपलं चारचौघात पाजळलं जाणारं "अज्ञान" दूर होण्यासाठी सावरकर वाचा.. विवेकानंद वाचा..! ज्ञानात भर पडेलच..! आणि "शेंडी- जानवं" यांची व्याख्याही कळेल.. अर्थही कळेल.. मूलतत्वसुध्दा कळेल...!

     चांगले वाईट..योग्य अयोग्य.. नीति अनिती.. पुण्य पाप यांची सांगड धर्म अधर्माशी घालणं हा हिंदुत्वाचा एक मुख्य गुणधर्म..! त्यामुळे माणूस कुकर्म करायला धजावत नसे..! कारण त्यावर धर्माचा नकळत पगडा असे..!सद्गुण- मांगल्य-नीति- सत्य म्हणजे धर्म..! आणि ह्या अशा सद्गुणांचे.. सद्विचारांचे आचरण करायला सांगणारे हेच शेंडी जानव्याचे "हिंदुत्व" आहे...!

एखाद्या मुद्द्याचा काथ्याकूट करणं आणि कृती करणं यात दोन धृवांचं अंतर आहे..! दसरा मेळाव्यात खोटा आवेश आणुन असंबध्द बडबड करण्याऐवजी चांगल्या विचारांवर वर्षभर कृती करणं केंव्हाही लाभदायक..! मोर नाचला म्हणुन लांडोर नाचतेयं..? गरीबांबद्दल वेदना घेऊन जगणं वेगळं आणि गरीबांना वेदना देणं वेगळं..! तुमची बाजू जर सत्याची असेल तर पृथ्वी प्रदक्षिणाही तुम्ही हसतखेळत कराल.. पण जर कां सत्य तुमच्या बाजूने नसेल तर थोडसं चालल्यावर तुम्ही अडखळुन पडाल.. जे चित्र सध्या रोज दिसतंय..! "टेलरमेड जंटलमन" जसे समाजात असतात तसे "पब्लिसिटी मेड पुढारी" मोठ्या प्रमाणावर राजकारणात दिसत आहेत..! अशावेळी जेंव्हा पैसा, पत, प्रसिद्धी, प्रभाव बोलु लागतो तेंव्हा सारं काही जनतेवर सोपवुन सत्य गप्प बसतं...!

"भोंदुगिरीला प्रबोधनकारांनी लाथाच घातल्या..!" असं तुम्ही म्हणता मग मनगटावर "शिवबंधन" गंडेदोरे बांधणं हे देखिल प्रबोधनकारांच्या नजरेतून हिंदुत्व नव्हे..! भोंदुगिरीच आहे..! स्वार्थ आणि परमार्थ यातील फरक जेंव्हा तुम्हाला कळेल तेंव्हाच तुम्हाला बाळासाहेब कळतील..! तेंव्हाच तुम्हाला प्रबोधनकार कळतील..! तेंव्हाच तुम्हाला सावरकर कळतील.. तुम्हाला विवेकानंद कळतील.. आणि तेंव्हाच तुम्हाला खरं हिंदुत्वही कळेल...!

 "वारसाहक्काने विनासायास हाती मिळालेलं वैभवशाली साम्राज्य.. आणि स्वतःच्या मनगटाच्या ताकदीवर स्वतः नवनिर्माण केलेलं राज्य" यातला तौलनिक फरक महाराष्ट्र पहातोयं.. देश पहातोयं..! हिंदुत्वाची चाड असती.. हिंदुत्वाची निष्ठा असती.. हिंदुत्वाचा स्वाभिमान असता.. हिंदुत्व हेच सर्वस्व मानत असता तर कितीही तात्विक वाद झाले.. कितीही पक्षीय वाद झाले.. कितीही राजकीय वाद झाले तरी तुमच्या वडिलांच्या "जातीविहीन" धगधगत्या "अंगार" हिंदुत्वाची तेजोमयी तळपती वाट तुम्ही झुगारलीच नसती..! आणि क्षणिक मोहमयी स्वार्थासाठी स्वतःची बौध्दिक - वैचारिक सुंथा करुन "भंगार" बाटगं हिरवं हिंदुत्व स्वीकारलंच नसतं...!

ओशो म्हणतात..

"जरुरतके मुताबित जिंदगी जियो.. ख्व्वाहिशें मुताबित नहीं..!

जरुरत तो फकीरोंकी भी पूरी हो जाती है.. लेकिन बादशाहोंकी नहीं...!"            

              

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained