Posts

Showing posts from July 23, 2023

Fastag charges

Image
 #FASTag  फास्टटॅग मध्ये बॅलन्स आहे पण फास्टटॅग स्कॅन होत नसेल तर ही चुकी टोल यंत्रणा, टोल प्लाझा, टोल कंत्राटदार, टोल इन्फ्रास्ट्रक्चर आणि सरकारची आहे. त्यापरिस्थितीत ते वाहन Exempted गृहीत धरून टोल (युझर फी) न घेता सोडले पाहिजे असा केंद्र सरकारच्या रस्ते मंत्रालयाचे ०७ मे २०१८ चे नोटिफिकेशन आहे. हा नियम आहे.

ओपनहायमरचा डंका....

Image
 *ओपनहायमरचा डंका....* *बहुचर्चित सिनेमा ओपनहायमर आज उद्या जागतिक स्तरावर प्रदर्शित होत आहे. भव्य चित्रपटांच्या दिग्दर्शनात अग्रेसर असणाऱ्या ख्रिस्तोफर नोलन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून संपूर्ण जगभर या चित्रपटाविषयीची उत्कंठा शिगेला पोचली आहे. जगातील अनेक शहरात या चित्रपटाचे अनेक दिवसाचे बुकिंग अगोदरच फुल्ल झालेले आहे. पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी तर त्याचे तिकीट दर २५०० रुपयांवर पोचले आहेत. या चित्रपटाचा कथानायक ओपनहायमर हा त्याने उद्धृत केलेल्या भगवद गीतेतील वचनांमुळे भारतीयांना अधिकच परिचित झाला. द्वितीय महायुद्ध साधारण सात वर्षे चालले. त्यादरम्यान घडलेले शास्त्रीय संशोधन, राजकीय आणि लष्करी घडामोडी, अणुबॉम्बचा शोध आणि अखेरीस त्याच्याच वापराने झालेली दुसऱ्या महायुद्धाची सांगता यामध्ये ओपनहायमरचे नेमके काय स्थान होते याची पार्श्वभूमी समजून घेतल्या खेरीज या चित्रपटाचा आनंद घेता येणार नाही. अन्यथा या चित्रपटाचे स्थान अन्य रंजक चित्रपटांपैकी एक एव्हढेच राहिल. या लेखाचा प्रपंच एव्हढ्यासाठीच आहे. हा लेख म्हणजे ओपनहायमर चित्रपटाची कथा नव्हे, फार तर एक करटन रेझर एव्हढेच म्हणता येई...