Maharashtra bhoomi ghotala granth
|| महाराष्ट्र भूमी घोटाळा ग्रंथ || प्रथमाध्यायः भक्त उवाच :- जय जयाजी काकेश्वरा सकळ भ्रष्ट आधार सत्ता उपभोगीशी माघारा आता विरोधी काय करीशी || १ || मागे होतो सत्तेत धन कमावले घटकेत झाले घोटाळे अपरिमित तरीही साव राहिलो त्या काळी || २ || आता सत्ता नाही राहिली केली कमळाबाईनी काहिली उकरून काढती जुन्या फाइली पळता भूमी कमी पडे || ३ || आधी दादा लटकला मग छगनही गुरफटला सुनीलही जलसंधारणे घसरला आता नाही खैर काही || ४ || तुझा फोनशिष्य असे नरेंद्र त्याचे बोलणे न टाळेल देवेंद्र फिरवी कळ हाती धरून अमितेंद्र त्राही त्राही काकेश्वरा || ५ || तूची असशी सर्वगामी सत्तेत विरोधी बडी असामी तूच करू शकशी कुलंगडी आता आम्हा तारी काकेश्वरा || ६ || ऐशी ऐकता मोहस्थिती नेत्रोन्मीलन करी पक्षश्रेष्ठी प्रेमहस्ते कुरवाळी आपल्या लेकुरांते काकेश्वर उवाच :- मी असे पावरबाज माझ्या अंतरी असे राजकाज संकट नसे मजवर काही आज पार करीन पैलपार || ७ || देशसेवा केली आपण त्याचेही असे काही मोल जाण घेतले ते थोडे अधिक आपण तेथे काय बिघडले || ८ || आसो सार्वजनिक बांधकाम वा असो दिल्लीचे महाराष्ट्र सदन सधन झाला असे माझा छगन त्या...