Posts

Showing posts from March 12, 2017

When will TMT improve its service ?

  ALERT CITIZENS FORUM OF INDIA डिसेंबर १४, २०१५ मा. आयुक्त साहेब, ठाणे महानगर पालिका, ठाणे. महोदय, ठाणे परिवहन सेवेच्या गलथान कारभाराबद्दल आम्ही आपल्याला आधी पण लिहिले आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ठाणेकरांना आधुनिक ठाण्याचे भव्य स्वप्न दाखविणाऱ्या ठाणे महापालिकेची रडतखडत सुरू असलेली परिवहन सेवा दीर्घकाळ झाला , पंक्चर असूनही त्यात हवा भरण्याचे काम नेमके कधी करणार , हा ठाणेकरांचा मुख्य प्रश्न आहे . रेल्वेच्या विस्ताराला असलेल्या मर्यादा , वाहतुकीच्या पर्यायी मार्गांना राजकारणातून घातलेला खोडा , रिक्षा संघटनांतील राजकीय हस्तक्षेप यामळे ठाणे शहराच्या वाहतुकीचे आधीच तीन तेरा वाजले आहेत . त्यात पालिकेची परिवहन सेवा हा आधार ठरण्यापेक्षा मन : स्तापाचे कारण होते आहे . परिवहनच्या ताफ्यात 300 बस असतांनाही सध्या अवघ्या 120 च्या आसपास बस रस्त्यावर धावत आहेत . दुरूस्ती - देखभालीसाठी निम्म्याहून अधिक म्हणजे 175 बस ठिकठिकाणच्या आगारात पडून आहेत . बेभरवशी सेवेमुळे दिवसेंदिवस प्रवासी घटत आह...