Posts

Showing posts from April 2, 2023

ब्रिटनच्या इस्लामीकरणाचा धक्कादायक प्रवास : अमंग द मॉस्क्स

Image
 *ब्रिटनच्या इस्लामीकरणाचा धक्कादायक प्रवास : अमंग द मॉस्क्स* सातव्या शतकात सौदीत जन्माला आलेला इस्लाम, नंतरच्या काही शतकांतच वावटळीप्रमाणे जगभर पसरला. अमेरिका, आफ्रिका, युरोप, आशिया अशी सर्वत्र घोडदौड करत असलेल्या इस्लामचा गेल्या सुमारे १०० वर्षांतला प्रामुख्याने इंग्लंडमधला प्रवास आणि प्रभाव याचं वर्णन एड हुसेन या लेखकाच्या Among the Mosques: A Journey Across Muslim Britain या पुस्तकात वाचायला मिळतं. जन्माने ब्रिटिश मुस्लिम असलेल्या लेखकाचे आईवडील हे बांग्लादेशी मुस्लिम आहेत. १९६१ मध्ये त्याचे आईवडील ब्रिटनमध्ये आले आणि तिथेच स्थायिक झाले. एड हुसेनचं हे इस्लामविषयक तिसरं पुस्तक असून The Islamist आणि The House of Islam या दोन पुस्तकांत त्याची पूर्वाश्रमीची जडणघडण, इस्लामकडे आकर्षित होणं, इस्लामचा अभ्यास याबद्दल तपशीलवार माहिती आहे. कालांतराने त्यातला फोलपणा कळून आल्यानंतर इस्लामचा ब्रिटनमधला प्रवास जाणून घेण्याच्या दृष्टीने केलेला प्रवास सद्य पुस्तकात पाहावयास मिळतो. या पुस्तकाच्या लेखनासाठी लेखकाने युकेमधील महत्वाच्या मुस्लिमबहुल शहरांमधून प्रवास केला, तेथील सामान्य नागरिक, प्रमुख व्