#Siachin
सियाचिन :...इथे पावलापावलावर मृत्यूशी संघर्ष असतो ... तिथलं सगळ्यात मोठं आव्हान कुठलं असेल तर ते म्हणजे जगणं ... इथे तैनात असलेला जवान तीन महिन्यांनी सुखरुप बेस कॅम्पवर परतला तर तो असतो त्याचा पुनर्जन्म ... सियाचिन... जगातली सगळ्यात उंचावर असलेली युद्धभूमी ... इथलं सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे जगणं... जिवंत राहणं ... सियाचीन या शब्दाचा अर्थ 'गुलाबांचं खोरं'.... पण इथे गुलाबांपेक्षा बोचणारे काटेच जास्त आहेत ... नजर जाईल तिथपर्यंत बर्फच बर्फ... पण समुद्रसपाटीपासून तब्बल २२ हजार फुटांवरचा बर्फ प्रचंड जीवघेणा. *चीन-भारत सीमारेषा: हिमालयाच्या काराकोरम रांगांमध्ये सियाचिन वसलंय. चीन आणि भारतीय उपखंडाला वेगळी करणारी ती रेषा... सियाचिन सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं... म्हणूनच सियाचिनच्या सुरक्षेशी अजिबात तडजोड केली जात नाही. *सुरक्षेवर १५०० कोटींचा खर्च: ७६ किलोमीटरचं असलेलं सियाचिन जगभरातलं दुसरं मोठं हिमशिखर... इथलं तापमान उणे ४० ते ५० अंश असतं, थंडीत ते उणे ७० पर्यंत खाली जातं... वारे वाहतात ते बंदुकीच्या गोळीच्या वेगानं... सियाचिनमध्ये जवळपास भारताची दीडशे पोस्ट आहेत. त्यावर सुमा...