Posts

Showing posts from August 20, 2017

*हिंदू दहशतवादाची भाकडकथा*

Image
* जागता   पहारा -------- भाऊ   तोरसेकर * जेव्हा   दाऊदला   मुंबईचा   सामान्य   माणूस   ओळखतही   नव्हता   आणि   गँगवॉर   हा   शब्दही   प्रचलित   झाला   नव्हता ,  तेव्हा   एक   खतरनाक   गुन्हेगार   दिल्लीच्या   तिहार   तुरुंगातून   फरारी   झालेला   होता .  देशभरातील   लोकांच्या   तोंडी   त्याचे   नाव   होते .  चार्ल्स   शोभराज   हाच   तो   माणूस !  तिहारच्या   रखवालदारांना   गुंगी   आणणारे   काहीतरी   खाऊ   घालून ,  हा   कैदी   सहीसलामत   निसटला   होता .  मग   त्याला   शोधून   काढण्याचे   व   ताब्यात   घेण्याचे   मोठे   नाटय   रंगले   होते .  ज्यांनी   त्याला   सर्वप्रथम   शिताफीने   पकडले   होते ,  त्याच   एका   ज्येष्ठ   पोलीस   अधिकाऱ्या...