महिला आरक्षण विधेयक पारित करा : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आवाहन
महिला लोकप्रतिनिधींच्या राष्ट्रीय परिषदेचे थाटात उद्घाटन महिला आरक्षण विधेयक पारित करा : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आवाहन संसद आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद असलेले, परंतु गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित विधेयक तातडीने पारित होण्याची आवश्यकता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज शनिवारी प्रतिपादित केली. महिलांना आरक्षण देणारे विधेयक पारित करण्याची जबाबदारी सर्व राजकीय पक्षांचीही आहे आणि ही जबाबदारी त्यांनी पार पाडली पाहिजे, असे राष्ट्रपती म्हणाले. ‘सशक्त भारताच्या निर्माणात महिला लोकप्रतिनिधींची भूमिका’ या विषयावरील द्विदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करताना राष्ट्रपती मुखर्जी बोलत होते. विज्ञान भवनात आयोजित या कार्यक्रमात व्यासपीठावर उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन आणि बांगलादेश संसदेच्या अध्यक्ष शिरीन चौधरी उपस्थित होते. महिला आरक्षण विधेयक दोनतृतीयांश बहुमताने लोकसभेत पारित झाले, मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत हे विधेयक पारित होऊ शकले नाही, याकडे मुखर्जी यांनी लक्ष वेधले...