रँचो - चाचड उर्फ शरीन बलोच
पाकिस्तानच्या कराची विद्यापीठात आत्मघातकी हल्ला करणाऱ्या महिलेचे नाव शरीन बलोच असे आहे. या स्फोटात तीन चिनी नागरिकांसह चार जणांचा मृत्यू झाला आहे.
चायनीज लँग्वेज सेंटरजवळून एक चायनीज व्हॅन जात असताना महिलेने स्वत:ला उडवले. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. हा हल्ला त्यांच्या फर्स्ट लेडी फिदायनने केल्याचे त्यांनी सांगितले. बीएलएने शरीन बलोचचे छायाचित्रही प्रसिद्ध केले आहे.
बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) च्या पहिल्या आत्मघाती महिला बॉम्बरचा पती हॅबिटन बशीर बलोच फोटोत दिसत आहे.
तिला दोन मुल सुद्धा होती... कराची विद्यापीठात चिनी नागरिकांना लक्ष्य करणारी शरीन बलोच उर्फ ब्रमश कृत्या बड्डलबल तिचा पति बशीर बलोच म्हणाला की शरीच्या कृत्याने तो अवाक झाला आहे आणि त्याला अभिमान आहे. तिने हे कृत्य करण्या मागे कारण सांगितले जात आहे की तिच्या भावाला पाक आर्मी ने अमानुष छळ करून मारले .
शरीन एक उच्च शिक्षित होती .
■ तिने 2014 मध्ये तिचे B.Ed आणि 2018 मध्ये M.Ed पूर्ण केले. ती प्राणीशास्त्रात पदव्युत्तर पदवीधर होती. अल्लामा इक्बाल मुक्त विद्यापीठाच्या तुर्बत कॅम्पसमधून एम.फिल देखील केले. तिला एक मुलगी आणि एक मुलगा (दोन्ही 5 वर्षांचा) होता. तिचे पती डॉक्टर आहेत, वडील बलुचिस्तान सरकारमध्ये संचालक होते.
■ तिचे संपूर्ण कुटुंब सुशिक्षित विद्वानांनी भरलेले आहे ज्यात लेखक, डॉक्टर, प्राध्यापक इत्यादींचा समावेश आहे. 2018 मध्ये तिच्या एका चुलत भावाला पाकिस्तानी सैन्याने केच जिल्ह्यात मारले होते. ती @BSO__AZAD ची सदस्य देखील होती.
Comments
Post a Comment