Posts

Showing posts from May 1, 2016

Jal hai to kal hai..

नागरिकांनो  आता तरी जागे व्हा मागील प्रत्येक १० वर्षांपूर्वी ३० ते ३५ अंश से असलेले तापमान आज ४० पार केले आहे..🌞🌞🌞🌞🌞 पुढील प्रत्येक ५:५ वर्षात ४५:५० नंतर ६० अंश से पर्यंत जाईल तेव्हा अशी रडायची वेळ येईल कि आहे ती झाडेही सुकतील . दिल्लीवाले पन बुलेट ट्रेनने पानी पाठवनार  नाहीत. नगर,  विदर्भ, मराठवाडा लातूर व्हायला वेळ लागनार नाहि.. सर्व नागरिकांनो , सर्व व्हाटस अप ग्रुप, सेवाभावी संस्था, ग्रुप ओफ कंपनीज व तमाम नागरिकांना जाहिर आवाहन ; जे करायचे ते स्वत:च करा. १.येत्या पावसाळ्यात प्रत्येकाने ५ झाडे लावा, ३ वर्ष पोटच्या मुलासारखे संगोपन करा. २. पानी वाचवण्याचा संदेश प्रसार करा. प्रत्येक धरणांचा गाळ काढण्यास मदत करुन पाण्याची पातळी वाढवण्याचा प्रयत्न करा. २० लाख नागरिक * ५:५ झाडे ##  १ करोड झाडे. ५ वर्षात ५ करोड झाडे मनापासून विचार करा... सरकारच्या भरोशावर राहु नका.  दरवर्षी झाडे लावतात कमीशन खातात. झाडे मरून जातात.परत लावतात. सर्वांनी एकत्र या हायवे, मोकळ्या जागा वाटून घ्या. दर रविवारी घर सोडा, एक दिवस पर्यावरन, संवर्धनासाठी द्या. रिकामे massages पाठवण्यापेक्क्षा हा १७६० वेळा पाठवा.

Rationalize the pace of Industrialization - Save Earth from Global warming

मोठया धरणांमूळे पाणी मिळत नसून उलट पाणी चक्राला (water cycle) बाधा येऊन अंतिमतः पाण्याच्या दुष्काळाकडे त्या भूभागाची वाटचाल होते...वाहणे हा नदीचा हक्क आहे...ती तशी वाहती राहीली तरच पाणी मानवासकट इतर जीवसृष्टीला अविरतपणे मिळत राहू शकते...अन्यथा नाही...धरणे ही सिमेंट, स्टीलच्या उद्योगाना प्रचंड मागणी मिळावी म्हणून बांधली जातात...पण समाजाने त्याचे समर्थन करावे म्हणून मानवी कल्याणाचा भ्रम पुढे केला जातो.... पृथ्वीवरचे पाणी हे मानवासकट सर्व जीवमात्रांच्या फक्त पिण्यासाठीच आहे...."उद्योगां(industry)साठी" नाही हे जोपर्यंत तथाकथित आधुनिक माणसाना समजत नाही तोपर्यंत पाण्याचा प्रश्न अधिकाधिक गंभीर होत जाणार आहे..... झाडे लावणे स्तूत्यच, पण कितीही झाडे लावली तरी जोपर्यंत आपण Industrialisation आणि त्यासाठी आलेले शहरीकरण याचा त्याग करत नाही तोपर्यंत पाणी दुष्प्राप्यच होत जाणार कारण आजचा पाणी दुष्काळ हा केवळ जागतिक तापमानवाढीमूळे होत असून त्या तापमानवाढीचे कारण केवळ कार्बन उत्सर्जन हेच आहे जे उद्योग(industry), वीजवापर, मोटारगाडयानी होणारी वाहतूक, सिमेंट व स्टील वापरून केलेली मोठमोठाली बां

The virtues of #Scotch

स्कॉच… (फक्त दर्दी लोकांसाठी) .... स्कॉटलंड यार्ड पोलिस आणि स्कॉच एवढ्या दोनच गोष्टींसाठी मला स्कॉटलंड माहितीये. न पाहिलेल्या स्कॉटलंडचा मी तहहयात ऋणी आहे. मोरावळा आणि स्कॉच जितकी जुनी होत जाते तितकी ती चविष्ट होत जाते. स्कॉच म्हणजे मधुबाला. क्वॉलीटी अशी की क्वांटीटीची गरज नाही. अत्यंत कठोर परिश्रमानंतर स्कॉच बनवतात तिकडे. प्रत्येक कंपनीचे पाणी घ्यायचे झरे ठरलेले आहेत असं वाचलंय. एक घोट घेऊन ती स्कॉच कुठल्या झ-याच्या पाण्यापासून तयार झाली आहे असं सांगणारे व्यासंगी लोक आहेत तिकडे. हे म्हणजे कॉलेजात शंभर फुटावरून पुसट दिसणा-या पाठमो-या मुलीची डिव्हीजन, आत्ता कुठे चाललीये, डावी उजवीकडे कोण कोण आहे असा तपशील देऊ शकणा-या महाभागाच्या व्यासंगाच्या तोडीचं आहे. स्टीलच्या ग्लासमधून घ्यायची वारुणी ही नव्हे, हे म्हणजे मधुबाला जात्याच सुंदर आहे म्हणून तिला प्लास्टिक जरीची दीडशे रुपये किमतीची लालभडक साडी नेसवण्यासारखं आहे. तिचा मान तिला द्यायलाच हवा. तिचा तो गोल्डन यलो कलर कट ग्लास मधे ओतल्यावर बघत रहावा नुसता. तळापासून संथ लयीत वरती येणारी मोहरीच्या आकाराच्या बुडबुड्यांची रांग, ग्लासच्या बाहे