आरे कॉलनी आणि मेट्रो शेड चे वास्तव
तथाकथित पर्यावरण चळवळ्यानो..........
जगात असे कोणते जंगल आहे जिथे खालील कामे केली जातात?
1) आधुनिक मॉर्डन बेकरी 2) कुक्कुटपालन केंद्र 3) आरे दूध डेअरी 4) शेकडो गाय, म्हैस तबेले 5) आरेतील अनेक युनिट्समध्ये अनेक शासकीय निवासस्थान 6) कृषी उद्योग केंद्र 7) अनेक ठिकाणी अनधिकृत झोपड्या 8) वनराई बिंबीसार कॉलनी, दूध सागर सोसायटी 9) 260 एकरमध्ये, रॉयल पाम्ससह उंच अनेक टेकड्या कापून आणि हजारो झाड तोडून उंच इमारतीची काम केली गेली आहेत 10) अदानीचे इलेक्ट्रिक स्टेशन 5 एकरांवर पसरले आहे.
आता मला सांगा, सगळीकडे झाडी नव्हती का? इथल्या झाडांनी ऑक्सिजन दिला नाही का??
260 मध्ये पसरलेल्या रॉयल पाममधील झाड तुम्ही कापले नाही का? अवघ्या 4 महिन्यांपूर्वी रॉयल पाममध्ये 500 झाडे तोडून 3 मोठे स्टुडिओ बनवले, कसे? कोणाच्या दयेवर???
लोकसंख्या वाढत असताना त्यानुसार वाहतूक सुविधाही वाढल्या पाहिजेत.
वरील सर्व क्रिया जगातील कोणत्या जंगलात होतात???
या कारशेडच्या ठिकाणी आरेतील इतर ठिकाणांपेक्षा कमी झाड आहेत, सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊन काम करण्यात आले आहे.
तोडलेल्या झाडाच्या बदल्यात चौपट वृक्ष लावण्यात आले आहेत.
कारशेड सरकारच्या मालकाचे आहे, त्यामुळे सरकारचे 5000 हजार कोटी वाचणार आहेत.
इतरत्र जागेवर अनेक वाद तंटे आहेत.मुंबईकरांच्या वाहतुकीच्या सोयीसाठी हे कारशेड बांधणे अत्यंत गरजेचे आहे.
या मेट्रोमुळे मुंबईचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
.......
जर आपण 40 वर्षे मागे गेलो तर आपल्याला काय दिसेल?
गोरेगाव आणि दिंडोशी नागरी निवारा परिसरा मध्ये गोरेगाव स्टेशनच्या पुढे टॉवरच्या इमारती नव्हत्या , सगळीकडे दाट झाडी होती, हे सर्व टॉवर हजारो झाडे तोडून बनवले आहेत, मग या ठिकाणी हजारो झाडे तोडण्यास मान्यता कोणी दिली??? हेच शिवसेनेच्या सत्ताधारी लोकांनी झाड तोडण्यास मान्यता दिली आहे.
पूर्वी भांडुप जोगेश्वरी लिंक रोड हे आरेचे ठिकाण होते, तिथेही सुंदर झाडे होती, ती तोडण्याचा अधिकार सत्ताधारी व bmc च्या अधिकाऱ्यांनी दिला होता ना!
विकासाच्या आड येऊ नका
मुंबईतील लोकांच्या जीवाची काळजी घ्या आणि मेट्रो कारशेडला पाठिंबा द्या.
Comments
Post a Comment