Posts

Showing posts from February 21, 2021

कोविड च्या दुसऱ्या लाटेचा सतर्कतेने मुकाबला करा

Image
 *ज्याप्रकारे कोविड महाराष्ट्रात वाढतोय, त्याची दुसरी लाट आली आहे. या लाटेचा सर्व नागरिकांनी सतर्कतेने मुकाबला केला पाहिजे. 1) मोठ्या प्रमाणात व्हॅक्सीनेशन करणे आवश्यक आहे. यासाठी प्रायव्हेट हाॅस्पिटलमधे ही सुविधा ऊपलब्ध करून देणे आवश्यक आहे.  2) जे पैसे भरून व्हॅक्सीन घेऊ शकतात, त्याना त्याप्रकारे घेण्याची सुविधा ऊपलब्ध करून दिली पाहिजे.  3) शिकाऊ डाॅक्टर्स ,नर्सेसनाही ट्रेनिंग देऊन त्यांच्या द्वारे ही लसीकरण करण्याची सुरवात केली पाहीजे. ३ अ) उदा.ठाण्यासारख्या ठिकाणी 1000 जणं जर रोज 100 जणाना लस दिली तर एका दिवसात 1 लाख लोकांचे लसीकरण एका दिवसात होईल. 30 दिवसात संपूर्ण ठाणेकरांचे लसीकरण पूर्ण होईल. असे महाराष्ट्रातील मोठ्या शहरात आणि तालुक्याच्या ठिकाणी 250 जण लसीकरण करणारे असतील तरी हे काम महिन्याभरात पूर्ण होईल.  4) सर्व ऑफिसमध्ये,  दुकानात मार्केट, हाॅटेलमधे एकावेळी किती लोक असावित याची मर्यादा त्या अस्थापनेच्या आकारमानाप्रमाणे मर्यादा घातली पाहिजे. 5) त्यासाठी पोलिसांसोबत स्वेच्छेने काम करणार्या स्वयंसेवकांची ,त्याना आवाहन करून त्यांची  मदत घेतली पाहीजे. 6) सर्व शाळा/ काॅलेजेस मार