Posts

Showing posts from May 28, 2017

ताई १० एकर जमीनीतून वर्षाला १०० कोटी कसे कमवायचे ?

Image
ताई १० एकर जमीनीतून वर्षाला १०० कोटी कसे कमवायचे याचे रहस्य आमच्या गरीब शेतकर्याला एकदा सांगून टाकाच.. Please म्हणतो...

गेली ६० वर्ष काँग्रेस ची सत्ता होती तेव्हा शेतकरी कर्जबाजारी नव्हता का...?

Image
ऐन पेरणीच्या वेळेला शेतकर्यांना संपासाठी प्रवृत्त करणारे नेते नंतर त्यांचे नुकसान भरुन देणार आहेत का.. समाजामध्ये ठिणगी टाकुन मजा बघणारे बहुतेक नेते त्या त्या क्षेत्रातील "शिक्षणमहर्षी" आहेत.. त्यांनी केलिये का फी माफी शेतकर्यांच्या मुलांना? अहो इतके वर्ष कृषिमंत्री कोण होते जाणता राजा मिरवणारेच ना... गेली ६० वर्ष काँग्रेस ची सत्ता होती तेव्हा शेतकरी कर्जबाजारी नव्हता का...? शेतकरी आत्महत्या करत नव्हते का...? मग गेली अनेक वर्ष जे झोपी गेलेली लोक अचानक जागे झाले कसे..? यासाठी  मी माझ्या शेतकरी बांधवाला जबाबदार नाही धरणार....पण मला शेतकरी जणांना इतकच सांगायच आहे आज जे जे लोक संप करायला प्रवृत्त करत आहेत किंवा पाठिंबा देत आहेत ते सत्तेत असताना कधी तुमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या आहेत का..? आपल्या देशात शेती आणि शेतकरी हा इमोशनल विषय आहे आणि त्याला हाताशी धरून जर कोणी राजकारण करत असेल तर हे लोकांनी वेळेच जाणून घेतलेल बर.... कारण गेली ६० वर्ष सत्ता ज्या पक्षाची होती तेव्हा पण शेतकरी कर्जबाजारी होताच, आत्महत्या करत होताच...मग सत्ता परिवर्तन झाल्यानंतर ३ वर्षात शेतकरी संपावर जातो क...

त्यांच्या हातून सत्ता गेली...

Image
त्यांच्या हातून सत्ता गेली. .. जातीची ढाल करून उभारलेल्या आंदोलनातुन मुख्यमंत्र्यांचा बळी घेण्याचा डाव सपशेल फसला... लाख युक्त्या केल्या तरी फडणवीस काही केल्या मुख्यमंत्री पदावरून हटत नाही. हेलिकॉप्टरला एवढा अपघात होऊनही मरत नाही... पारदर्शक कारभारामुळे मित्रपक्षाला मलाई खायला मिळत नाही... काही मित्रपक्षातील लोकांना माझ्या कनिष्ठ सहकार्याला मंत्रीपद मिळालं पण मला नाही, हा पोटशूळ सलतो आहे... काही अपक्ष आमदारांनी तर मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्याची सुपारीच घेतलेली आहे... लोकांमधील आपली विश्वासार्हता संपली आहे, त्यामुळे आपल्याला कुणी भीक घालत नाही, संघर्ष यात्रेचाही फज्जा उडाला... म्हणूनच आपल्या स्वार्थासाठी शेतकऱ्याचे नाव घेऊन नवे चेहरे पुढे करून शेतकर्याला सॉफ्ट टार्गेट करून स्वतःचे डाव साधले जात आहेत... राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पडद्याआडून सर्वाधिक प्रमाणात हालचाली करत आहे. कारण सत्तेशिवाय या पक्षाचं अस्तित्व शून्य आहे... आजवर कुठच्या सरकारने ५०५०/- या भावाने इतकी प्रचंड तूर खरेदी केलेली आहे, जरा आपल्या काळातील कामगिरी सुद्धा तपासून बघा... अरे, मंत्रालयाला घेर...

*होय! हे शेतकऱ्यांचेच सरकार आहे!!!*

Image
*होय! हे शेतकऱ्यांचेच सरकार आहे!!!* *मुख्यमंत्र्यांच्या रोखाने शेतकऱ्यांच्या नथीतुन तीर मारणाऱ्या राजकीय शिखंडींच्या बाणात खरेच भाजप सरकारला बदनाम करण्याएवढी ताकद उरली आहे का?* *शेतकरी संप आणि शेतकरी हित(?)कर्त्या "जुन्या"जाणत्या नेत्यांची पडद्याआडची वळवळ* कोणतीही चर्चा मान्य न करता अखेर शेतकरी संपावर गेलेच. सरकारविरोधात शेतकऱ्यांच्या लाठ्याकाठ्या बाहेर पडल्या. रस्त्यावर दुध, भाज्या ओतण्याचे स्टंट ठिकठिकाणी चालू झाले. प्रश्न कोणाचे, भाजीपाला-फळे- दूध कोणाचे, ओतणारे कोण, प्रश्न सोडवणार कोण, आणि बोंबाबोंब करताहेत कोण! सगळीकडे सावळागोंधळ! आणि खरं तर हा सावळा गोंधळ निर्माण करणे, आणि त्याचा धुरळा हवेत उडवून शेतकरी वर्गाला संभ्रमित आणि हवालदिल करणे, हे एकच कारण आणि हेतू या सगळ्यामागे आहे. प्रसार माध्यमांसह सोशल मीडियावर काही जणांकडून असे चित्र उभे केले जात आहे, कि आज आणि आजच, नव्हे आताच जर कर्जमाफी झाली नाही, तर शेतकरी जगणेच शक्य नाही. मागील सत्तर वर्षात असे काही इतके भयंकर आक्रीत दुसरे काही घडलेच नव्हते! इतके हे महाभयंकर आक्रीत आहे कि आता सगळे काही संपले. आता फक...

शेतकरी संप - मुजोर काँग्रेस व राष्ट्रवादी राजकारण्यांचा कुटिल डाव:

Image
शेतकरी संप - मुजोर काँग्रेस व राष्ट्रवादी राजकारण्यांचा कुटिल डाव: अरे काय चाललंय ??? प्रथम काही प्रश्न जे माझ्या बुद्धीला पडलेत १) नक्की कुठल्या शेतकरयांना कर्ज माफी हवी आहे ?? अगणित जमीन जुमला , घरात बुलेट आणि स्कॉर्पिओ , डस्टर अशा गाड्या असणाऱ्या शेतकरयांना कि ज्याची खायचे वांदे आहेत अशा शेतकऱ्याला २) इतके वर्ष शेतकरी नियमित कर्ज फेड करत होता कि हि गेल्या काही वर्षातील साचलेली कर्जे आहेत ? ३) संप करताना अन्नाची नासाडी का ?? ४०-५० हजार दूध रस्त्यावर ओतून नक्की काय साधले ? भाजीपाला रस्त्यावर टाकून उन्मत्त पणे त्यावरून गाडी नेणे ....... असा शेतकरी आहे ?? ४) नक्की शेतकरी संपावर आहेत ? कि पक्षीय गुंड शेतकऱ्यांवर जबरदस्ती करतायत ??

पिकवलेल्या अन्नाची नासाडी करु नका

Image
जो स्वत:ला शेतकरी म्हणवतो, त्याला स्वत:च्या व इतरांच्या कष्टातून भुमातेकडुन पिकवलेले अन्न नासाडी करुन निषेध व्यक्त करणे जमतेच कसे? मेहनतीने पोसलेल्या जनावरांचे दूध रस्त्यावर फेकणे, भाज्यांच्या ढिगार्‍यांवरुन गाड्या चालताना पाहणे कसे जमले?  अन्न हे पूर्ण ब्रम्ह आहे विसरु नका. आपल्या मुलांनी दोन शितं जास्त सांडली, तर आपण त्याला समजावतो, बाळा अन्नाचा अपमान करु नकोस म्हणुन. इथे मुद्दा हा आहे. *संप जरुर करा पण स्वतः* *पिकवलेल्या अन्नाची ना साडी करु नका ..* 🙏 ​

हा नक्की संप आहे का?...

Image
हा नक्की संप आहे का?... ही नक्की क्रांती आहे का?... हे नक्की आंदोलनच आहे ना? ४८ हजार लीटर दूध रस्त्यावर ओतणारा शेतकरी आहे का? शेकडो किलो भाजीपाला, धान्याची नासधूस करणारा हा खरोखर शेतकरीच आहे का? हे सर्व मेहनतीनं पिकविणारे, हेच का ते शेतकरी, गाड्या जाळणारे, टायर फोडणारे हे शेतकरीच आहेत का? एवढी करोडो रूपयांची नासधूस करणाऱ्यांना खरोखरच कर्जमाफी हवीय का? अमूल्य असा भाजीपाला, धान्य वगैरे फुकट घालवणाऱ्यांना, खरोखरंच बाजारमूल्य वाढवून पाहीजे का?.... हे सर्व आंदोलनकर्ते नक्की शेतकरीच आहेत ना, की महा'राष्ट्रा'त वाद निर्माण करणारे, गेली ७० वर्षे देशाची, राज्यांची, अर्थव्यवस्था बिघडवणारे, की सत्तेत असून सुध्दा, काहीही 'खायला' न मिळणारे अतृप्त आत्मे आहेत.... नक्की हे कोण आहेत, शेतकरीच आहेत का ?

*मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रपरिषदेतील ठळक मुद्दे* :

Image
*मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रपरिषदेतील ठळक मुद्दे* : - आज झालेल्या राज्यस्तरिय बँकर्स समितीच्या बैठकीत 54000 कोटी रूपयांचे पीककर्ज आणि 23000 कोटींचे टर्मलोन अशा क्रेडिटप्लानला मंजुरी प्रदान - पीककर्ज हे गेल्यावर्षीपेक्षा 3500 कोटींनी अधिक, गेल्यावर्षी 82 टक्के पीककर्ज वाटप - औरंगाबाद, जळगाव, नागपूर, वर्धा, परभणी, पुणे, रायगड, सांगली अशा 10 जिल्ह्यांमध्ये जेथे जिल्हा बँका अवसायनात आहेत, तेथे शेतकर्‍यांना कर्ज मिळण्यासाठी 7 दिवसांत निर्णय - शेतकरी संपाबाबत शेतकरी नेत्यांशी सरकारने सातत्याने चर्चा केली, यापुढेही चर्चा केली जाईल, प्रत्येक मुद्यावर चर्चेची तयारी - सरकार सकारात्मक कारवाई करते आहे, पण, काही लोक शेतकर्‍यांच्या आड कायदा हाती घेऊ पाहत आहेत. असे करून ते शेतकर्‍यांचेच अधिक नुकसान करीत आहेत. - जे लोक दुधाची नासाडी करीत आहेत, त्यांनी आधी शेतकर्‍यांना दुधाचे पैसे द्यावे. - शेतकर्‍यांकडून 20 रूपयांत दूध खरेदी करून मुंबईत 70 रूपये दूध विकणार्‍या नेत्यांनी शेतकर्‍यांना अधिकचा भाव द्यावा. राज्याच्या दुधाचा ब्रँड संपवून नेत्यांनी आपले ब्रँड मजबुत केले. - ज्यांच्या स...

शेतकरी संप

शेतकरी संप राज्यात विरोधी पक्षाने शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळावी यासाठी राज्यात संघर्ष यात्रा काढली. ही संघर्ष यात्रा सहल होती, गेट टुगेदर होते. या बद्दल विविध तर्क काढता येवू शकतात.संघर्ष यात्रेला अपेक्षीत यश मिळाले नाही. आज सत्तेपासून दूर असलेले काँग्रेस, राष्ट्रवादीसारखे राजकीय पक्ष याआधी सत्तेवर असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे कानाडोळा करायचे ही वस्तुस्थिती संपामध्ये सामील झालेल्या सगळ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे कारण आजपासून सुरु झालेल्या या शेतकरी संपाच्या निमित्ताने राज्यात नवे राजकारण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जे मराठा मोर्चाच्या मालिकेने साध्य झाले नाही, जे 'संघर्ष यात्रे' च्या माध्यमातून जमले नाही, ते राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न शेतकरी संपाच्या निमित्ताने होऊ शकतात. यासाठी राज्यातील तमाम शेतकऱ्यांनी सजग राहिले पाहिजे.

Company buses illegally stopping near edge of flyovers and causing traffic hazards and accidents

Image
ALERT CITIZENS FORUM OF INDIA   ​May 30, 2017 The DCP (Traffic), Thane City, Thane. ​Respected Shri Sandeep Palwe ji, cc: CP Thane = for information cc: Shri Sanjay Kelkar, MLA, Thane City Today morning I was on my way to work, travelling from Saket complex ​, Thane ​  towards Mulund. As I reached the first flyover near Rutu Park, there was a huge jam. Getting closer, I found 3 Transport luxury buses  ​had ​ stopped near the beginning of the flyover, offloading people. They were the reason of the jam. Driving further on the bridge, I saw 3 Company buses stop at the end of that flyover offloading / picking up passengers. One bus stopped suddenly and I almost bumped into it. This sequence continued on the rest of the 3 flyovers. In fact, this is a daily practice and such illegal stoppage not only create traffic snarls but also are reason that cause accidents on the highways. We request you to please look into the matter and give instructions to your squad...