Posts

Showing posts from June 25, 2023

शिंदे फडणवीस सरकार चे पहिले वर्ष

Image
 शिंदे फडणवीस सरकार चे पहिले वर्ष  आज 'आपल्या' सरकारची वर्षपूर्ती होत आहे. आपल्या सरकारने या 52 आठवड्यात केलेल्या व मला आवडलेल्या 52 कामांविषयी थोडी माहिती देत आहे.. 1.) फडणवीस सरकारच्या पहिल्या टर्म मध्ये जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत 20000 गावांमध्ये 6 लाख स्ट्रक्चर तयार करून गावे जल स्वयंपूर्ण केल्यावर, यंदा जलयुक्त शिवार 2.0 योजना सुरू करण्यात आली आहे. 2.) नमो शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान सन्मान योजनेच्या ₹6000 सोबत आता आपले सरकार अजून ₹6000 जमा करणार. 3.) राज्यातील आजवरची सर्वात मोठी कर्जमाफी देवेन्द्र फडणवीस सरकारने सन 2017 साली छत्रपती शिवाजी महाराज कृषि सन्मान योजनेअंतर्गत दिली होती, ज्यात शेतकऱ्यांची 34022 कोटी रुपयांची कर्जमाफी देऊन 89 लाख शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. मागील 3 वर्षांत ज्या पात्र शेतकऱ्यांना मविआ सरकारच्या काळात लाभ मिळाला नाही, त्यांना लाभ मिळवून देण्याचे आश्वासन आता देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. 4.) देवेन्द्र फडणवीस यांच्या सरकारच्या पहिल्या टर्म मध्ये मागेल त्याला शेततळे (दीड लाख शेतकऱ्यांना शेततळे दिली होती) दिल्यानंतर, आ