*समाजाने अाता बदललेच पाहिजे*
*समाजाने अाता बदललेच पाहिजे* ==================== १. डोंगर, जंगल, नदी, चौक, गल्ली, शहर, गांव सगळीकडे मंदिरे पुष्कळ आहेत. नवीन मंदिरं उभारणी बंद करा. वर्गणी देऊ नका. तोच पैसा मुलांच्या शिक्षणावर, कुटुंबाच्या आरोग्यावर, गुंतवणूकीवर खर्च करा. २. दिंड्या, वा-या, सप्ताह यात सहभागी होऊन पापमुक्ती व मोक्षप्राप्तीच्या नादात व्यक्ती आपल्या प्रगतीचे (वेळ-पैसा-श्रम) चक्रच मारून टाकतो. पैसा व बुध्दीचा अपव्यय होतो. कर्मातच देव आहे यावर विश्वास ठेवा. ३. 'माणूस सोबत काहीच घेऊन जात नाही', हे सांगण्यासाठी बुवा २५-५० हजार रुपये घेतो. अशा स्वामी, महाराज, बुवाबाबा यांचा नाद सोडा. शेती, व्यवसाय, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, गुंतवणूक यांच्याशी निगडीत विचारवंतांच्या व्याख्यांनांचे आयोजन करा. ४. शेतीतील, कुटुंबातील, गावकुसातील वाद समापोचाराने मिटवा. कोर्ट, कचे-यांचा मार्ग टाळा. ५. कुटुंबातील सदस्यांवर, समविचारी मित्रांवर प्रेम करा. त्यांच्यासाठी वेळ द्या. सुख-दु:खात ते तुमची जास्त काळजी घेतील. ६. शेतीवरच अवलंबून न राहता हळूहळू उद्योग-व्यवसायाकडे वळा आणि एकमेकांना व्यवसायासाठी...