कुंभमेळ्यात शाही स्नान म्हणजे काय असते?
कुंभमेळा (Kumbha Mela) आणि त्यानिमित्ताने तीर्थक्षेत्री शाही स्नानाला (Shahi Snan) साधु आखाड्यांमध्ये महत्वाचं स्थान आहे. कुंभमेळ्यात विविध आखाड्यांमधील साधुंना एखाद्या राजाप्रमाणे मान दिला जातो. हरिद्वार (Haridwar) येथे कुंभमेळ्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. 11 मार्चला महाशिवरात्री निमित्ताने पहिलं शाही स्नान होत आहे. त्यानंतर होणाऱ्या 3 शाही स्नानांची तारीख आणि वेळ घोषित करण्यात आली आहे. पहिल्याच शाही स्नानावेळी साधुंमध्ये वादविवाद होऊ नये, शाही स्नान शांततामय वातावरणात पार पडावं यासाठी प्रत्येक आखाड्याला क्रम आणि स्नानची जागा नेमून दिली जाते. शाही स्नान म्हणजे काय? वैराग्य स्विकारलेल्या साधुंशी त्याचं नातं काय जाणून घ्या. शाही स्नान शतकानुशतके चालू आहे. यात 13 आखाडे (Aakhade) सहभागी होतात. ही कोणतीही वैदिक परंपरा नाही. या शाही स्नानाची सुरुवात 14 ते 16 शतकादरम्यान झाली असावी, असं मानलं जातं. या काळात मुघलांच्या आक्रमणाला सुरुवात झाली होती. धर्म आणि परंपरेचे मुघल आक्रमणांपासून संरक्षण होण्यासाठी हिंदू राज्यकर्ते आखाड्यातील साधूंची विशेषतः नागा साधूंची (Naga Sadhu) मदत घेत असत. ना...