#Battle cry
भारतीय सेनेमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या रेजिमेंट आहेत... पंजाब रेजिमेंट, राजपूत रेजिमेंट, बिहार रेजिमेंट, डोग्रा रेजिमेंट, मराठा लाइट इन्फेंट्री व महार रेजिमेंट ह्या त्यातल्या काही रेजिमेंट आहेत, सगळ्याच जन्मजात पराक्रमी... यांच्या सर्वांच्या युद्धगर्जना "battle cry किंवा war cry" अतिशय सुंदर आणि आत्मिक शक्ती जागृत करणाऱ्या आहेत... पंजाब रेजिमेंटची युद्धगर्जना "जो बोले सौ निहाल" अशी आहे. नागा रेजिमेंटची युद्धगर्जना "जय दुर्गा नागा" अशी आहे. जाटरेजिमेंटची युद्धगर्जना "जाट बलवान, जय भगवान" अशी आहे. डोग्रा रेजिमेंटची युद्धगर्जना "ज्वाला माता कि जय" अशी आहे. तर, बिहार रेजिमेंटची "जय बजरंगबली" अशी आहे. सगळ्या युद्धगर्जना त्यांच्या-त्यांच्या देवांच्या नावाने आहेत... पण, यामध्ये दोन रेजिमेंटच्या युद्धगर्जना थोड्या वेगळ्या आहेत, त्यांच्या युद्धगर्जना अतिशय मनाला भावतात, त्या दोन रेजिमेंट म्हणजे "महार रेजिमेंट आणि मराठा लाइट इन्फ्रंट्री....!" महार रेजिमेंटची युद्धगर्जना, "बोलो भारत माता की जय" अशी आहे... देशाचं नाव असल...