Posts

Showing posts from October 24, 2021

संघटना म्हणजे काय ?

Image
 *संघटना म्हणजे काय ?*    *एकाच विचाराने प्रेरित होऊन  एकाच उद्देशासाठी लढणारे लोक एकत्र येऊन जो गट तयार होतो त्याला संघटना असे म्हणतात.*    *अनुकूल दिवसांत दिसणारी शंभर डोकी म्हणजे संघटना नाही.तर प्रतिकूल दिवसांत साथ देणारे काही मोजके सहकारी म्हणजे संघटना. हवेबरोबर तोंड फिरवणारी १०० वातकुक्कुट डोकी म्हणजे संघटना नव्हे;तर वादळातही ठामपणे पाय रोवून आपल्या ध्येयाशी ईमान राखणारे शिलेदार म्हणजे संघटना होय.*   *सामाजिक क्षेत्रात वावरताना मानापमान, राग, लोभ, आरोप, प्रत्यारोप होणारच.वैचारिक मतभेद तर अपरिहार्यच परंतु अनेक अडचणींना तोंड देऊन जे काही टिकून राहते;ते म्हणजे संघटना.    *म्हणून संघटित होऊ संघर्ष करु.अन्यायावर मात करु.* *राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता या ग्रंथात दोन ओळींत संघटनेचे महत्व व्यापकतेने विषद केले आहे.ते म्हणतात…*   *हत्तीस आवरी गवती दोर! मुंग्याही सर्पास करती जर्जर!! रानकुत्रे संघटोनी हुशार! व्याघ्र-सिंहासी फाडती!!   *यावरुन मानवाच्या जीवनात संघटनेचे महत्त्व किती मोठे आहे हे आपण समजू शकतो.असे म्हणतात की,मनुष्य हा समाजशील प्राणी आहे.समाजात (समूह) राहूनच मानवाचा सर्