जागतिक आर्थिक मंदीचा धोका
जागतिक आर्थिक मंदीचा धोका जागतिक वित्तीय संस्था काहीही सांगत असल्या आणि सकल उत्पन्न वाढीचे आकडे जाहीर करीत असले, तरी प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती अतिशय भयंकर आहे. सध्या जगभरात आर्थिक मंदीची भीती वाढत आहे. अर्थशास्त्रज्ञांच्या मते, येत्या एका वर्षात जगभरातील अनेक अर्थव्यवस्था सरकारी धोरणं आणि वाढत्या जीवनमानाच्या खर्चामुळं आर्थिक मंदीत प्रवेश करणार आहेत. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था, अमेरिका, तसंच युरोपीयन संघ, ब्रिटन, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा हे देश आर्थिक मंदीच्या गर्तेत सापडू शकतात. जगभरातील केंद्रीय बँका महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्याजदर वाढवत असल्याचं नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटलं आहे. जागतिक मानसिकतेची पर्वा न करता, मध्यवर्ती बँका त्यांची धोरणं अधिक कडक करत आहेत. एका संशोधन अहवालानुसार, जर रशियानं युरोपला होणारा गॅस पुरवठा पूर्णपणे बंद केला, तर युरोपीय देशांमधील मंदी आणखी गडद होऊ शकते. युरोपच्या अर्थव्यवस्थेला एक टक्के नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि दक्षिण कोरियासारख्या देशांमध्ये गृहनिर्माण क्षेत्र मोडकळीस आल्या...