My life mantra...
*साधं सोप्पं जगावं |* दिलखुलास हसावं *न लाजता रडावं |* राग आला तर चिडावं *पण झालं-गेलं वेळीच सोडावं |* आपल्या माणसांवर हक्कानी रुसावं *रूसलेल्यांना लाडानी पुसावं (विचारावं) |* वळण येईल तेंव्हा सावकाश वळावं *मोकळ्या रस्त्यावर मात्र सुसाट पळावं |* चमचमीत झणझणीत बाहेर दाबून चापावं *पण घरच्या वरण-भातानेच मात्र पोट भरावं |* नालायकांना पुरून उरावं *मदतगारांना आयुष्यभर स्मरावं |* खोट्या दिखाव्यांना नक्कीच टाळावं *स्वप्नांच्या पूर्ततेसाठी दिवस रात्र झटावं* सुंदर जग बनवल्याबद्दल मात्र त्या *परमेश्वराच ऋणी* जरूर राहावं 🌺🌻🌷🙏🌷🌻🌺