How Israel overcomes drought challenges...
हा लेख इस्रायलबद्दल आहे पण ठिबक सिंचनाबद्दल नाही. कारण ठिबक सिंचनाचा शोध लावून आणि ऊस, कापूस ते धानापर्यंत पाणी खेचणाऱ्या पिकांसाठीही ठिबकने कशा प्रकारे पाणी पुरवठा करता येतो हे जगाला दाखवून दिल्यानंतरही इस्रायलमध्ये पाणीबाणी निर्माण झाली होती. इस्रायलमध्ये मोठ्या नद्या नाहीत. पर्जन्यमान वर्षाला ५० सेमी आणि देशाचा ५०%हून अधिक असलेल्या वाळवंटी भागात ते ५ सेमीहून कमी, सुपीक जमिनीचा अभाव इ. गोष्टी आता महाराष्ट्रातील बऱ्याच जणांना माहिती झाल्या आहेत, त्यामुळे त्याचे चऱ्हाट लावण्याचे काही कारण नाही. पण असे असूनही इस्रायलमध्ये गेल्या दशकात सलग ७ वर्षे दुष्काळ पडला. याच कालावधीत देशाच्या लोकसंख्येत ३०% हून अधिक वाढ झाल्याने पिण्याच्या तसेच घरगुती वापरासाठीच्या पाण्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. बरं सर्वत्र ठिबकचा वापर होत असल्याने अमुक एका पिकावर बंदी घाला तमुक कारखाने बंद करा असं म्हणण्याचीही सोय नव्हती. अशा परिस्थितीत इस्रायलने काय केले हे गेल्या आठवड्यात मुंबईत आलेल्या तेथील राष्ट्रीय जल प्राधिकरणाचे प्रवक्ते उरी शोर यांच्याशी बोलताना समोर आले. ते महत्त्वपूर्ण असल्याने लेखाच्...