गिरीश कुबेर यांच्या अकलेचे तारे
गिरीश कुबेर यांच्या अकलेचे तारे लोकसत्तेच्या आजच्या (29 जून) संपादकीयात ("पुढचे पाठ, मागचे सपाट) संपादक गिरीश कुबेर यांनी काही खास अकलेचे तारे तोडले आहेत ज्यांचा रीतसर पंचनामा करणे गरजेचे आहे. सदर संपादकीयात मोदी सरकारच्या परराष्ट्र नीतीवर टीका केलेली आहे. मोदी सरकारच्या अमेरिकेशी वाढत चाललेल्या जवळिकी मुळे इतर देश (इराण, चीन) आपल्या विरुद्ध अधिक ताठर भुमिका घेऊ लागले आहेत. यामुळे नवीन मित्र जोडण्याच्या नादात काही राष्ट्रांशी असलेली जुनी समिकरणं आपण बिघडवित आहोत असा या संपादकीयाचा एकंदर होरा आहे. शेवटच्या परिच्छेदात दोन मुद्दे मांडलेले आहेतः (1) नवीन मित्र (म्हणजे अमेरिका) जोडण्याच्या आपल्या अट्टाहासामुळे ...