BJP ने Congress कडून सत्ता कशी टिकवायची ते शिकायला पाहिजे...
BJP ने Congress कडून सत्ता कशी टिकवायची ते शिकायला पाहिजे... BJP ची सर्वात मोठी चूक म्हणजे त्यांनी लोकांना त्यांच्या लायकी पेक्षा जास्त स्वप्न दाखवली. काळा पैसा परत आणायचा त्यांनी नक्कीच चांगला प्रयत्न केला, आणि त्यापेक्षाही काळा पैसा पुन्हा generate होणार नाही यासाठीही खूप प्रयत्न केले. पण भरतातल्या चोरांनी बाहेर ठेवलेला पैसे किती आहे, हे त्यांनी जाहीर करायला नको होते. दुसरे उदाहरण: स्वच्छ भारत अभियान. भारत स्वच्छ करणे, हे पंच वार्षिक योजनेचे काम नव्हे. तुम्ही भलेही सगळीकडे कचरा उचलायला माणसे नेमू शकता, सफाई कामगार वाढवू शकता, पण कचरा करणाऱ्यांचे काय? सरकार ची तयारी असली तरी लोकं अजून स्वच्छ भारतासाठी तयार नाहीयेत. लोकांना स्वच्छतेचे महत्व कळतंच नाही, येता जाता रस्त्यावर थुंकू नये, ST मधून खाल्लेल्या केळ्यांची सालं बाहेर टाकू नयेत...या सवयी चुकीच्या आहेत हे त्यांना समजलेले नाही. स्वच्छ भारत अभियान फेल झाले असे म्हणणारे नेहमी रस्त्यावरच्या कचऱ्याचे उदाहरण देतात, पण हा कचरा रोज जनताच तयार करते, हे विसरतात. तिसरे उदाहरण: electric supply. गेली 3 वर्षे आमच्या ठाण्यात load s...