पेगासस चा ही फुसका बार…
पेगाससचाही फुसका बार… साप साप म्हणायचे आणि भुई थोपटायची, अशी सवय काँग्रेस पक्षाला झाली आहे. राहुल गांधींपासून तालुका अध्यक्ष पर्यंत सगळे याच माळेचे मणी आहेत. यांच्या आरोपांत काही तथ्य नसते, तरीही ते ओरडत सुटतात. मोदींना शिव्या दिल्या की ल्युटिअन्स मीडिया उचलून धरतो. संसदेतले कामकाज रोखता येते. डावे पक्ष यांच्यासारखे बोलभांड सोबत घेतले की गलका करता येतो हा काँग्रेसचा गेल्या आठ वर्षातला नित्यक्रम झाला आहे. पण प्रत्येकवेळी आरोप फुसके निघतात आणि हे सगळे तोंडावर आपटतात. पेगासस प्रकरणात तसेच घडले आहे. केंद्र सरकारने विदेशातून पेगासस नावाचे सॉफ्टवेअर खरेदी केले, त्याचा वापर करून विरोधकांच्या फोन संभाषणावर लक्ष ठेवले जात आहे, असा खोटा आरोप हंगामी राजकारणी राहुल गांधी आणि त्यांच्या चौकडीने केला. त्यांनी आरोप करायचीच खोटी, मोदी विरोधातील माध्यमे आणि राजकीय पक्ष झाडून कामाला लागले. शिमग्यालाही लाज वाटावी, अशी बोंबाबोंब करण्यात आली. संसद बंद पाडली गेली. पत्रकार परिषदांचा रतीब सुरु झाला. प्रकरण न्यायालयात गेले. मुळात विरोधक नेमके काय बोलतात यावर लक्ष ठेवण्यासाठी कोणत्याही सॉफ्टवेअर...