मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन चे नाव बदलून 'जगन्नाथ शंकरशेठ रेल्वे स्थानक' करण्याची विनंती
ALERT CITIZENS FORUM OF INDIA A7/303, Saket CHSL, Saket Marg, Thane (W) 400601 # जुलै ७, २०१७ प्रति, मा. रेल्वे मंत्री, भारत सरकार, नवी दिल्ली . महोदय, विकासाची वाट स्वकीयांना दाखवण्यासाठी मुंबईच्या रेल्वेपासून अनेक उपक्रमांत आघाडीवर असणारे आणि स्थानिकांची, एतद्देशीयांची बाजू समजून घेऊन त्यांचे प्रतिनिधित्व करणारे नाना ऊर्फ जगन्नाथ शंकरशेठ. नाना शंकरशेठ यांना आधुनिक मुंबई चे शिल्पकार मानले जाते. मुंबई शहरातील अनेक सामाजिक व राजकीय संस्थांच्या उभारणीस त्यांनी हातभार लावला ज्यामध्ये “बॉम्बे असोसिएशन”,“बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी”,“एल्फिन्स्टन कॉलेज”,“ग्रेट मेडिकल कॉलेज”,“स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी” या सामाजिक व शैक्षणिक संस्थांचा समावेश होता. विशेष म्हणजे मुंबई विद्यापीठ आकाराला येण्यामागे नाना शंकरशेठ यांची दुरदृष्टी होती. नानांनी मुंबई विद्यापीठातर्फे १८६६ सालापासून जगन्नाथ शंकरशेठ संस्कृत शिष्यवृत्ती ही अत्यंत मानाची समजली जाणारी शिष्यवृत्ती सुरू केली ती आजतागायत सुरू आहे. नाना शंकरशेठ काऊंसिलमध्ये असतानाच १८६४ साली मुंबई शहरातील जनतेला पायाभूत ...