तुही यत्ता कंची ??
तुही यत्ता कंची ?? पंतप्रधान नरेंद्र मोदी शैक्षणिक गुणवत्तेवरून वादळ उठवण्याचे हिणकस प्रयत्न सध्या सुरु झाले आहेत.या माणसाला आपण पहिले गुजरात दंगलीत बदनाम करण्याचा आटोकाट प्रयत्न केला .नंतर मौत का सौदागर ठरवून राजकीय आयुष्यातून उठवण्याचा चँग बांधला.निर्लज्जपणे त्याच वैयक्तिक कौटुंबिक जीवन चव्हाट्यावर आणण्याचे अश्लाघ्य प्रयत्न केले. तरीही जनतेने पूर्ण बहूमताने त्याला दिल्लीचे तख्त बहाल केले हे जिव्हारी लागलेल्या मंडळीना त्याच प्रधानमंत्री असणं हेच अवघड जागेच्या दुखण्यासारखं झालय.आम्ही तुला तिथे सहनच करू शकत नाही हे सत्य सांगण्याची हिंमत नसणाऱ्या दिवाभीतांनी नंतर जीवाचे रान करून असहिष्णुता सारख्या बालिश मुद्द्यावर देश पेटवण्याचा प्रयत्न केला. तरीही हा माणूस आणि याचं सरकार दिवसेंदिवस लोकप्रियच होत आहे हे या वास्तवाने नाउमेद झालेल्या नतदृष्टां नी मग विदेश यात्रांपासून तर अंगावरच्या सुटपर्यंत गदारोळ उठवला.भ्रष्टाचार किवा अन्य कशातच तो सापडत नाही याचे वैफल्य येऊन अखेर देशद्रोहाचे समर्थन करण्याइतपत कमरचे लज्जावस्त्र बाजूला काढून ठेवले...आणि आता नवीन प्रश्न ते प्रधानमं...