ज्यांना आरे बद्दल काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी..👇






 ज्यांना आरे बद्दल काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी..👇


'आरे' कारशेड बद्दल पसरवल्या जात असलेल्या अफवा आणि तथ्य..👇


*१. *अफवा* : 'आरे' हे एक जंगल आहे

*तथ्य* : 'आरे' हे जंगल नाही. ही आरे महामंडळाची सरकारी जागा आहे.


*२. अफवा* : संपूर्ण आरे नष्ट करत आहेत.

*तथ्य* : आरे ही एकूण १६ स्केवर किलोमीटर आहे एवढी जमीन आहे. जवळपास २००० ते २५०० हेक्टर एवढी जमीन आरे ने व्यापली आहे. आणि त्यात मेट्रो कारशेड चा एरिया फक्त २७ हेक्टर एवढा आहे.


*३. अफवा* : मेट्रो कारशेड साठी संपूर्ण आरेतील झाडे तोडत आहेत.

*तथ्य* : आरेत एकूण ५ लाख वृक्ष आहेत, त्यातील मेट्रो च्या कारशेड मध्ये फक्त २२०० एवढी वृक्ष येत आहेत. एकूण झाडांच्या २२०० वृक्ष तोडले त्याच्या ७ पट वृक्ष लावलेले आहेत. 


*४. अफवा* : आरेत हिंस्त्र वन्यजीव राहतात. (बिबट्या, वाघ, कोल्हा,) 

*तथ्य* : आरे त कोणतेही वन्यजीव राहत नाहीत (पाळीव प्राणी असतात उदा. कुत्रा, भटक्या गाई म्हशी चरण्यासाठी येत असतात.) त्यामुळं सोशल मीडियात बिबट्या आणि झाडाचे फोटो वायरल होत आहेत ते फेक आहेत.


*५. अफवा* :कारशेड हा आरेत च का आरे संपवण्याचा घाट आहे.?

*तथ्य* : कारशेड ला उपयुक्त अशी जागा आरे मध्ये आहे कारण ती सरकार ची जागा आहे. दुसऱ्या ठिकाणच्या जागेला जी जागा याचिका कर्त्यांनी दाखवली आहे ती खाजही मालकीची आहे त्या जागेची किंमत जवळपास ५ हजार करोड आहे. 


*६. अफवा* : मेट्रो ही खाजगी कंपनीची आहे

*तथ्य* : मेट्रो ही महाराष्ट्र सरकार ची आहे . मेट्रो चालवण्यासाठी सरकार मे स्वतंत्र प्राधिकरण स्थापन केलेलं आहे. सरकार ची म्हणजे सर्वसामान्य लोकांची. मुंबईत असलेली पहिली मेट्रो ही रिलायन्स अनिल अंबानी यांची आहे. 


*७. अफवा* : आरे त फक्त झाडे आहेत आणि जंगल आहे.

*तथ्य* : आरेत आदिवासी लोकांची पक्की घरे आहेत, आरेत रॉयल पाम नावाचे पंचतारांकित हॉटेल आहे, रहिवाशी सोसायटी आहे, आरेत दादासाहेब फाळके फिल्मसिटी आहे., आरेत हॉटेल व्यावसायिक आहेत


Comments