अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा अडीच पट जास्त लोकांना आम्ही मोफत धान्य दिलं : पंतप्रधान मोदी
अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा अडीच पट जास्त लोकांना आम्ही मोफत धान्य दिलं : पंतप्रधान मोदी कोरोनासोबत लढताना भारतात सरकारने 80 कोटी पेक्षा जास्त लोकांना 3 महिन्यांचे रेशन पाच किलो गहू आणि तांदूळ मोफत दिले. अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षा अडीच पटीने जास्त लोकसंख्येला आणि ब्रिटनच्या लोकसंख्येपेक्षा 12 पटीने जास्त लोकांना आमच्या सरकारने मोफत अन्नधान्य दिलं आहे”, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली, तसेच अनेक मोठ्या घोषणाही केल्या. लॉकडाऊनदरम्यान केंद्र सरकारची देशातील प्रत्येक घरात चूल पेटली पाहिजे ही सर्वात पहिली प्राथमिकता होती. एकाही नागरिकाने भुकेल्या पोटी झोपी नये यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन सर्वांनी प्रचंड मेहनत घेतली. देश असो किंवा व्यक्ती वेळेवर आणि संवेदनशीलतेने निर्णय घेतल्यावर कोणत्याही संकटाचा सामना करण्याची शक्ती वाढते. लॉकडाऊन होताच सरकार प्रधानमंत्री गरिब कल्याण योजना घेऊन आलं. या योजनेअंतर्गत गरिबांसाठी 1.75 लाख कोटींचं पॅकेज दिलं गेलं. गेल्या तीन महि...