*महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता आणि मीडिया च्या बोगस बातम्या*
*महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरता आणि मीडिया च्या बोगस बातम्या* शांतीन घ्या.. JUST CHILL... *महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली.. ठीक आहे ना*... एवढा गोंधळ घालण्याची काय गरज आहे? कोण दोषी? कोणामुळे लागली? हे फालतू चे पोस्टमार्टेम चालू आहे.. कस काँग्रेसच चुकलं, कशी पवार साहेबांनी फजिती केली, कसा सेनेचा गेम झाला आणि कशी भाजप जिंकली.. अरे, भाजप जिंकायला काय त्यांचं सरकार आलं आहे का? की त्यांच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला आहे? लोकांनी बहुमत देऊन, सर्वात मोठा पक्ष ठरवून केवळ सेनेला दिलेला शब्द न पाळण्यामुळे (असं सेना म्हणते) राज्याला अस्थिरतेच्या खाईत लोटलं आहे आणि याचा कसला आनंद?? भाजपने काँग्रेस सारख मोठं मन दाखवायला पाहिजे होत. कर्नाटकात जस लहान पक्ष असूनही काँग्रेसने JDS चा मुख्यमंत्री केला आणि राज्याला सरकार दिल तर भाजपही महाराष्ट्रात करू शकली असती.. पण हम नाही तो कोई नही, कुछ भी नाही हा अहंभाव नडला महाराष्ट्राला.. *आणि मीडिया पण, त्या TRP साठी किती घाई करायची*..? कालचा तर सगळा गोंधळ मीडियामुळे झाला.. सगळं त्यांनीच ठरवलं आणि आपण खर मानलं.. बर खर मानून गप्प बसू ...