Open letter to #GirishKuber, Editor, #Loksatta
प्रती, श्री गिरीश कुबेर साहेब, माननीय संपादकदैनिक लोकसत्ता,मुंबई, विषय :- लोकसत्ता या वर्तमानपत्रातील दिनांक २ डिसेम्बर २०१५, रोजी प्रसिद्ध झालेल्या “बिनडोकांची राष्ट्रभक्ती” या मथळ्याच्या अग्रलेखा संदर्भातील चुकीच्या नोंदी संदर्भात. महोदय, आपल्या लोकसत्ता या वर्तमानपत्रातील दिनांक २ डिसेम्बर २०१५, रोजीच्या “बिनडोकांची राष्ट्रभक्ती” या अग्रलेखामध्ये आपण चुकीचे संदर्भ दिले आहेत. राष्ट्रगीत चालू असताना उभे राहण्याचा कोणताही नियम नाही असे सांगताना आपण प्रिवेन्शन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर ॲक्ट १९७१ चा दाखला दिला आहे. या दाखल्या संदर्भात आपण इतर बाबींचा उल्लेख केलेला नाही. शिवाय १९७१ नंतर याच संदर्भात झालेल्या अनेक दुरुस्त्यांचा / बदलांचाही संदर्भ आपण वाचकांपासून लपवून ठेवला आहे. तुमच्या लेखामुळे राष्ट्रगीताच्या वेळी जनतेने आणि विशेषतः समाजातील एका विशिष्ट समुदायाने उभे राहिले नाही तरी चालेल असे अप्रत्यक्षपणे सुचविले गेले आहे. मी आपणास हे निदर्शनास आणू इच्छितो की, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स म्हणजेच गृह मंत्रालयाच्या संकेत स्थळावर http://www.mha.nic.in/national ,...