The #AgustaWestland Scam (in Marathi)
कॉंग्रेसच्या काळातील आणखी एक घोटाळा देशात कॉंग्रेसचे सरकार असताना सर्वात ठळक वैशिष्ट्य काय, असे जर कोणी विचारले तर घोटाळा इतकेच उत्तर देता येईल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळा, डाळ आयात घोटाळा, गहू घोटाळा, साखर घोटाळा, आदर्श घोटाळा, टू जी स्पेक्ट्रम घोटाळा, कोळसा खाण घोटाळा अशी ही यादी संपते न संपते तोच आता आणखी एक घोटाळा पुढे आला आहे. कॉंग्रेस सरकारच्या काळातील हा आणखी एक घोटाळा भाजपा किंवा अन्य विरोधी पक्षांनी बाहेर काढलेला नाही किंवा कोणीतरी आरोप केलेला नाही, तर चक्क सोनिया गांधींच्या माहेरकडून हा आहेर आलेला आहे. इटलीमधील एका न्यायालयाने म्हटले आहे की, तर्कसंगत पुराव्यानिशी असे निष्कर्ष निघतात की, हेलिकॉप्टर खरेदीमध्ये दहा ते पंधरा दशलक्ष डॉलर्सचा एक अवैध निधी भारतीय लोकांना पोहोचविला गेला. हा मलिदा खाणारे कोण? असा प्रश्न लगेच उभा राहतो. टाइम्स नाऊ या टीव्ही चॅनेलने असे म्हटले आहे की, या न्यायालयाच्या निकालात पाच वरिष्ठ भारतीय नेत्यांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. तत्कालीन वायुदलप्रमुख मार्शल शशी त्यागी यांचे नाव तर अगदी स्पष्टपणे आले आहे. भारतात कॉंगे्रस संस्कृतीने क...