नव्या शैक्षणिक वर्षात शाळांची फी वाढ शासनाने रोखावी ही विनंती
अलर्ट सिटीझन्स फोरम ऑफ इंडिया A7/303, साकेत गृह संकुल, ठाणे (प) ४००६०१ जून ४, २०२० विषय: नव्या शैक्षणिक वर्षात शाळांची फी वाढ शासनाने रोखावी ही विनंती महोदया, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे प्रत्येकाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात शाळांची फी वाढ शासनाने रोखावी. उलट फीमध्ये कमीतकमी 10 टक्के सूट द्यावी, अशी विनंती आम्ही अलर्ट सिटीझन्स फोरम तर्फे आपणाला करीत आहोत. राज्यातील बर्याच शाळा 10 टक्के ते 30 टक्केपर्यंत तर काही शाळा त्याहून अधिक फी वाढ करत आहेत किंवा लागू केली आहे, अशा तक्रारी आमच्याकडे अनेकांनी केल्या आहेत. या संबंधी आम्ही खालील मुद्द्यांवर आपले लक्ष वेधू इच्छितो: 1. खाजगी शाळांच्या फी मध्ये 10 टक्के वाढ करणार असे कळते. तश्या प्रकारची वाढ करण्यात येऊ नये कारण पालक आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. 2. मार्च पासून शाळा बंद आहेत त्यामुळे 'टर्म फी' म्हणून आधीच घेण्यात आलेल्या फी मधील 4 महिन्यांची फी रक्कम पुढील टर्म ची फी म्हणून ऍडजस्ट करावी. 3.जर आधीच भरलेली टर्म फी पूढील टर्म मध्ये ऍडजस्ट करण्यात येत नसेल तर याप...