राज्यांनी लसीकरण - घ्या थोबाडात
राज्यांनी लसीकरण - घ्या थोबाडात लसीकरणाची मागणी वाढणार आहे आणि कोट्यवधी लसी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले तर आपल्या अंगाशी येणार याचा वास आल्याबरोबर केंद्र सरकारने जणूकाही आपण निर्णयाचे लोकशाहीकरण करत आहोत अशा अविर्भावात राज्य सरकारांना तुम्हीच जागतिक टेंडर काढा असे सांगितले राज्य सरकारांनी तो हास्यस्पद प्रकार अजून पुढच्या पातळीवर नेला ; उदा मुंबई महानगर पालिकेने स्वतःचे ५० लाख लसीचे ग्लोबल टेंडर काढले ; जणू काही जागतिक लस उत्पादन करणाऱ्या कंपन्या एकमेकात स्पर्धा करणार होत्या ; एकही जागतिक कंपनीने साधा प्रतिसाद देखील दिला नाही _____________ आता फायझर , मॉडर्ना या आघाडीच्या कंपन्यांनी जाहीरपणे सांगितले कि आम्ही फक्त देशांच्या केंद्र सरकारबरोबर धंदा करू ; टिल्लू बिल्लू बरोबर नाही एकतर आपल्यासाठी ५० लाख वगैरे मोठा एकदा वाटेल ; हजारो कोटी डॉलर्सचा धंदा करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना ती सुटी नाणी असतात या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले कि कोणत्याही देशात लसीकरण हा राष्ट्रीय सरकारच्या अखत्यारीतला विषय राहिला आहे ; हे राज्य सरकारे, महापालिका ...