15 हजारांहून कमी पगार असणाऱ्या कामगारांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ;
15 हजारांहून कमी पगार असणाऱ्या कामगारांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ Ayushman Bharat Scheme : जर तुम्ही असंगठिक कामगार असाल आणि तुमचं मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांहून कमी असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही ई-श्रम पोर्टलवर तुमची नोंदणी करू शकता. यामुळे कोणतीही दुर्घटना आणि आजारपणादरम्यान येणाऱ्या खर्चाच्या चिंतेपासून मुक्त होऊ शकता. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्यास कामगारांना दोन लाखांचा विमा मिळणार आहे. तसेच कुटुंबासाठी वार्षिक 5 लाखांपर्यंतचं आरोग्य सुरक्षा कवच देणाऱ्या आयुषमान योजनेतही समावेश होतो. तसेच, आणीबाणीच्या प्रसंगी सरकारी मदतही उपलब्ध होईल. कोणत्याही मदतीसाठी हेल्पलाइन नंबर 14434 वर संपर्क साधू सकता. तसेच www.gms.eshram.gov.in पोर्टल मार्फत कोणतीही तक्रार दाखल करु शकता. असंघटित कामगारांमध्ये बांधकाम कामगार, घर काम करणारे कामगार, रिक्षाचालक, फेरीवाले, स्थलांतरित आणि प्लॅटफॉर्म कामगार, कृषी कामगार, मनरेगा कामगार इत्यादींचा समावेश होतो. परंतु, यांचं मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांहून कमी असणं गरजेचं आहे. कशी कराल नोंदणी?...